अकोला : महावितरणच्या वीज बिलाच्या थकबाकीत मोठी वाढ झाली. परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांकडे २२१ कोटी रुपयाच्या वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने वसुली मोहीम तीव्र केली. ग्राहकांकडून वसुली करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. परिमंडळांतर्गत अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील वीज बिलाची थकबाकी कमी होण्याऐवजी वाढत आहे. त्यामुळे वसुली तीव्र करून थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. याशिवाय खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा तत्काळ ऑनलाईन प्रणालीत भरण्याचे बंधन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संपूर्ण थकबाकीसह सिंगल फेज साठी ३६० आणि थ्री फेज साठी ६१४ रूपयाचे पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय त्या ग्राहकाचा वीज पुरवठा सुरू करता येत नाही. महिन्याचे शेवटचे चार दिवस बाकी असतांना परिमंडळांतर्गत अकोला जिल्हा ७४ कोटी, बुलढाणा जिल्हा १०७ आणि वाशीम जिल्ह्यातून ३९ कोटी रुपयाचे थकीत वीजबिल बाकी आहे. महावितरणच्या वीजबिल वसुली मोहिमेत बिल न भरणाऱ्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी देखील नियोजित वेळेत सुरू ठेवले जातील.

हेही वाचा : अकोला : भाजपा नेत्यांशी लागेबांधेमुळे विमा कंपन्यांची मुजोरी, काँग्रेस प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणेंचा आरोप

अधीक्षक अभियंत्यांकडून तपासणी

वीज पुरवठा खंडित केल्यानंतरही वीज बिल वसुली होत नसल्याने अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्याकडून आकस्मिकपणे त्या ग्राहकांची तपासणी केली जात आहे. त्या प्रक्रियेला वेग देण्यात आला. ग्राहकांकडे अनाधिकृत वीज पुरवठा सुरू असल्याचे आढळल्यास त्या ग्राहकांवर वीज चोरी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola buldhana and washim msedcl cut power supply of those who have not paid electricity bill appeal to pay bill ppd 88 css