अकोला : जिल्ह्यातील चान्नी पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस हवालदाराने तक्रारदार महिलेचा विनयभंग करून शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करण्यात आली. त्यानंतर शनिवारी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पातूर तालुक्यातील एका गावात तक्रारदार महिला, पती, दोन मुले व सासऱ्यांसह राहते. १४ एप्रिल रोजी तक्रारदार महिला व तिच्या पतीने मारहाणीची तक्रार चान्नी पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात परस्पर विरोधी तक्रार दाखल झाली होती. २२ एप्रिल रोजी चान्नी पोलीस ठाण्यातील हवालदार बाळकृष्ण येवले (ब.नं.१६३६) याने तक्रारदार महिला व पतीला पोलीस ठाण्यात बोलावून कारवाईचे पत्र दिले. दरम्यान, येवले याने महिलेशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला. त्याने २३ एप्रिल रोजी संबंधित महिलेच्या घरी तिचा विनयभंग करून शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार संबंधित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ६ मे रोजी दिली. संबंधित पोलीस कर्मचारी मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोपही या महिलेकडून करण्यात आला आहे. पोलीस हवालदार येवले आणि महिलेच्या संभाषणाच्या अनेक ध्वनीफित देखील तक्रारदार महिलेने दिल्या आहेत. या तक्रारीची प्रत गृहमंत्री, पोलीस महासंचालक व जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील पाठविण्यात आली. त्यानंतर अखेर शनिवारी चान्नी पोलीस ठाण्यात संबंधित पोलिसावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
Chargesheet by CBI filed against three including prevention officer in bribery case
लाचखोरीप्रकरणात प्रतिबंधक अधिकाऱ्यासह तिघांविरोधात आरोपपत्र दाखल, सीबीआयची कारवाई
fraud with woman doctor karad , karad ,
सातारा : सीमाशुल्क अधिकारी असल्याचे भासवून महिला डॉक्टरला गंडा
pune steroid injections
पुणे : स्टेरॉईड इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री, दोन जणांवर गुन्हा दाखल
Badlapur case, Suspension woman police officer,
महिला पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन, बदलापूर प्रकरणी राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
badshah traffic violation allegation
बादशाहवर वाहतुकीचे नियम मोडल्याने झाली कारवाई? रॅपर स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाला, “माझ्याकडे तर…”

हेही वाचा…शाळेतून मुलीला घरी सोडताना निर्जनस्थळी नेले… ‘तो’ नराधम ऑटोचालक अखेर गजाआड….

सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीसच जनतेची छळवणूक करीत असल्यास सर्वसामान्य जनतेने जावे कुठे?, पोलीस जनतेचे रक्षक की भक्षक? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यकडून उपस्थित केले जात आहेत.

पोलिसांची प्रतिमा मलिन

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडीवरून अकोला पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचे चित्र आहे. अकोट येथे आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. एका डॉक्टरच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला चार तास पोलीस ठाण्यात थांबवण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यानंतर आता एका पोलिसानेच तक्रारदार महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला.

हेही वाचा…अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पाच बालविवाह रोखले……

संबंधितावर तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सखोल तपास केला जात आहे. – विजय चव्हाण, ठाणे प्रभारी, चान्नी पोलीस ठाणे.

Story img Loader