अकोला : अकोल्यातील विद्यमान खासदार सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. निवडणुकीत त्यांचे व्हेंटिलेटर काढतील, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार संजय धोत्रे यांचे नाव न घेता गुरुवारी येथे केले. त्यानंतर त्यांनी सारवासारव करीत संजय धोत्रे माझे मित्र असल्याचे सांगितले. या वक्तव्यावरून वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : ‘वंचित’च्या पाठिंब्यानंतरही आनंदराज आंबेडकर माघारीवर ठाम; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर केले आरोप

cpm polit bureau
सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?
Hezbollahs influence hasan nasarullah
“लेबनॉनवर हल्ले म्हणजे युद्धाची घोषणा”; हिजबुलच्या प्रमुख नेत्याचं वक्तव्य, कोण आहेत हसन नसराल्लाह?
pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन
omar abdullah in trouble over bjp alliance talk
भाजपशी युतीच्या चर्चांमुळे अब्दुल्लांच्या अडचणींमध्ये भर
loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?

अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाना पटोले गुरुवारी अकोल्यात आले होते. यावेळी स्वराज्य भवन येथे आयोजित सभेत ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले, ‘भाजपमध्ये असतांना २०१४ ते २०१७ पर्यंत खासदार होतो. ज्यावेळी जीएसटी आणि नोटाबंदी आली, त्यावेळी नरेंद्र मोदींचा समोरासमोर विरोध केला. त्यावेळी अकोल्याचे विद्यमान खासदार देखील तिथे उपस्थित होते. ते आता व्हेंटिलेटरवर आहेत. व्हेंटिलेटर केव्हा काढतील मला माहिती नाही. पण ते निवडणुकीतच काढतील.’ पुढे बोलतांना नाना पटोलेंनी खासदार संजय धोत्रे मित्र असल्याचेही सांगितले. नाना पटोले यांनी खा. संजय धोत्रे यांच्या प्रकृतीवरून केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.