अकोला : लग्नसराईचा काळ सुरू असल्याने सराफा बाजारपेठेत उलाढाल वाढली आहे. सोन्यातील गुंतवणुकीकडे देखील ग्राहकांचा कल दिसून येतो. सोन्यावरील कलाकुसरीतून निर्माण झालेल्या दागिन्यांची अवाजवी घडणावळ ग्राहकांसाठी चांगलीच तापदायक ठरते. घडणावळ ठरवण्याचा कुठलाही नियम नसल्याने दागिने दालनांची साखळी चालवणाऱ्या काही नामांकित ज्वेलर्ससह स्थानिक सराफा व्यावसायिकांकडून मनमानी पद्धतीने दर आकारण्यात येतो. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांवरील महागड्या कलाकुसरीची ग्राहकांच्या खिश्याला झळ बसत आहे. भारतात सोन्याचे दागिने खरेदीला सर्वाधिक पसंती दिली जाते. सणासुदीसह लग्नसराईला मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी होते. गुंतवणुकीचे सर्वात सुरक्षित माध्यम म्हणून देखील सोन्याकडे पाहिल्या जाते. सोन्याच्या प्रचंड मागणीमुळे आज त्यांची किंमत ६,१०९ रुपये प्रति ग्रॅमवर पोहचली आहे. सोन्याच्या शुद्धतेवर देखील प्रश्न निर्माण होतो.

सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क व दर हे १००-५०० च्या फरकाने जवळपास सारखेच राहत असल्याने त्यातील फसवणुकीचे प्रमाण कमी झाले. मात्र, ग्राहकांची सर्वाधिक लूट होते ती घडणावळीमध्ये. दागिन्यांच्या घडणावळीचा दर सगळीकडे सारखा नसतो. घडणावळीचा दर हा सोन्याच्या शुद्धतेवर अवलंबून असतो. यंत्राद्वारे निर्मित दागिन्यांच्या घडणावळीचा दर वेगळा असतो. कलात्मक पद्धतीने तयार केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची घडणावळ जास्त असते. सोन्याच्या दराच्या ६ टक्के ते १४ टक्के घडणावळ लावली जाते. कोरीव काम अधिक असल्यास घडणावळ सोन्याच्या २५ टक्क्यांपर्यंत लावली जाते. सध्या सराफा बाजारपेठेत ग्राहकांची सर्वाधिक लूट घडणावळीच्या दरावरूनच होत आहे. एकाच प्रकारच्या दागिन्यांवर विविध ज्वेलर्समध्ये वेगवेगळे दर बघायला मिळतात. यामध्येच ग्राहकांची फसगत होत असल्याचे चित्र आहे.

David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Gold Silver Price Today 12 November 2024 in Marathi
Gold Price Today : खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा आजचा भाव

हेही वाचा : “आदित्य ठाकरे नर्सरीचा मुलगा”, नितेश राणे यांची टीका

अकोल्यात सराफा व्यावसायिकांची मोठी बाजारपेठ आहे. दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. स्थानिक ज्वेलर्सकडून तीन ते १० टक्क्यापर्यंत घडणावळ आकारली जाते. दागिने दालनांची साखळी चालवणाऱ्या ज्वेलर्सकडून घडणावळीचे दर १८ ते २३ टक्क्यापर्यंत आहेत. संपूर्ण सोन्याचे कॉईनवर ज्वेलर्सकडून प्रति ग्राम ५० ते १२० पर्यंत, तर साखळी ज्वेलर्सकडून चार टक्के दर घेतले जात आहेत. अनेकवेळा घडणावळीवर सूट असल्याचे भासवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा देखील सराफा व्यावसायिकांकडून वापरण्यात येतो. तेच दागिने मोडतांना १० टक्क्यापर्यंत घट केली जाते. घडणावळीचा दर अनिश्चित असल्याने हे ग्राहकांच्या लुटीचे माध्यम बनले आहे.

हेही वाचा : वर्धा : अखेर रेल्वेस जाग आली, तीन दिवसांत मिळणार मेल गाडीचा थांबा

‘इतर’च्या नावावरही लूट

सोन्याच्या दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या देयकामध्ये काही नामांकित ज्वेलर्सकडून इतरच्या नाववरही दर आकारून ग्राहकांची लूट केली जात आहे. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोन्याच्या दरात सूट असल्याचे दाखवत काही ज्वेलर्स घडणावळ व इतरच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार देखील सर्रास घडत आहेत.

व्यावसायिकांचे म्हणणे काय?

“अकोला सराफा बाजारपेठेत अत्यल्प घडणावळीमध्ये दर्जेदार दागिने उपलब्ध करून देण्याचा व्यावसायिकांचा प्रयत्न असतो. अनेक ज्वेलर्स सोन्याच्या कॉईनवर घडणावळ देखील घेत नाहीत. स्थानिक ज्वेलर्सकडून ग्राहकहिताला प्रथम प्राधान्य दिले जाते.” – शैलेश खरोटे, अध्यक्ष, अकोला सराफा असोसिएशन, अकोला.

“ग्राहकांना कमीत कमी दरामध्ये शुद्ध व दर्जेदार दागिने देण्याचा प्रयत्न असतो. घडणावळीचे दर दागिन्यांच्या बनावटीनुसार वेगवेगळे असतात. ते कारागिरालाच द्यावे लागतात.” – सुरेश पाचकवडे, सराफा व्यावसायिक, अकोला.