अकोला : जिल्ह्यात कारमधून प्रतिबंधित गुटखा साठ्याची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नया अंदुरा येथे छापा घालून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून कारसह १४ लाखांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांना इनोव्हा कारमध्ये (क्र.एमएच ४३ एएल २०६४) नया अंदुरा येथील हरिओम उर्फ ओम उमेश कराळे (२१), अमोल रवी तायडे हे प्रतिबंधित सुंगधित तंबाखू व गुटखा विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पीएसआय देशमुख यांनी त्यांच्या पथकातील अंमलदार व पंचासह ग्राम नया अंदुरा येथे नाकाबंदी करून कार थांबवली. कारमधील विविध प्रकारचा शासनाने प्रतिबंधित केलेला व आरोग्यास अपायकारक गुटखा जप्त केला. पोलिसांनी कारसह गुटखा असा एकूण १४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा – भल्या पहाटे घर गाठले, ‘गोल्डन मॅन’वर बंदूक ताणली, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला भंडाऱ्यातील थरार

हेही वाचा – १० हजारांची लाच स्वीकारतांना सरपंच अडकला

आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन उरळ येथे गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभयकुमार डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांच्या मार्गदर्शनात दत्ता ढोरे, विशाल मोरे यांनी केली.

Story img Loader