अकोला : गत दोन दशकांमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात झालेल्या पाच निवडणुकांमध्ये भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. तिरंगी लढत भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची परंपरा विरोधक यावेळेस सुद्धा खंडित करू शकले नाहीत. संजय धोत्रे यांनी निर्माण केलेला अकोला भाजपचा गड पूत्र अनुप धोत्रे यांनी कायम राखला. यावेळेस लोकसभेतील मताधिक्य कमी झाल्याने आता विधानसभा निवडणुकीत दबदबा कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे राहणार आहे. अकोला मतदारसंघात स्वबळावर काँग्रेस किंवा वंचितला गेल्या साडेतीन दशकात यश मिळवता आलेले नाही. १९९८ आणि १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. त्रिकोणी लढतीचा नेहमी भाजपला फायदा झाल्याचा इतिहास आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेस एकत्र आल्याशिवाय भाजपचा पराभव होऊ शकत नसल्याचे लोकसभेच्या गेल्या १० निवडणुकांतील आकडेवारीतून स्पष्ट होते. लोकसभेच्या गत चार निवडणुकांत तिरंगी लढतीमध्ये खा. संजय धोत्रेंनी विजयाची परंपरा निर्माण केली, ती अनुप धोत्रे यांनी कायम ठेवली. २००४ मध्ये संजय धोत्रेंनी काँग्रेसचे लक्ष्मणराव तायडेंवर एक लाख ०६ हजार ३७१ मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत संजय धोत्रे आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत होऊन एक लाख ०४ हजार ७५० मतांनी धोत्रे दुसऱ्यांचा विजयी झाले.
हेही वाचा : इरई व झरपट नदीच्या विद्रुपीकरणास वेकोली जबाबदार, चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे न्यायालयात शपथपत्र
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत संजय धोत्रेंनी अनुक्रमे दोन लाख तीन हजार ११६ आणि दोन लाख ७५ हजार ५९६ मतांनी प्रतिस्पर्धांना पराभूत केले. प्रकृतीच्या कारणामुळे संजय धोत्रे सक्रिय राजकारणापासून दूर झाले. त्यामुळे यावेळेस त्यांचे पूत्र अनुप धोत्रे यांना भाजपने संधी दिली. काँग्रेसने देखील मराठा उमेदवार दिल्याने यावेळेस भाजपसाठी निवडणूक अवघड समजल्या जात होती. भाजप व काँग्रेसमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे अनुप धोत्रे यांनी ४० हजार ६२६ मतांनी विजय प्राप्त केला. राजकीय व सामाजिक समीकरण बदलले असताना निकाल मात्र भाजपसाठी नेहमीप्रमाणे सकारात्मक ठरला. २०१९ मध्ये भाजपला लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघामध्ये मोठी आघाडी होती.
२०२४ मध्ये सहापैकी चार ठिकाणी भाजप, तर दोन ठिकाणी काँग्रेसला आघाडी मिळाली. सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे, तर काँग्रेस व ठाकरे गटाचे प्रत्येकी एक आमदार आहेत. एक जागा रिक्त आहे. काँग्रेसने बाळापूर व अकोला पश्चिममध्ये आघाडी घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. अकोला पश्चिम हा गेल्या तीन दशकांपासून भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात काँग्रेसने मिळवलेली मते भाजपसाठी चिंतनाचा विषय ठरला आहे. अकोट व मूर्तिजापूरमध्ये देखील भाजपला अपेक्षित मोठी आघाडी मिळालेली नाही. रिसोडमध्ये विद्यमान आमदार असतांना भाजपने मिळवलेले मताधिक्य काँग्रेससाठी डोकेदुखीचे ठरेल. अपेक्षेप्रमाणे अकोला पूर्वमध्ये भाजपने मोठे मताधिक्य घेऊन विजय सुकर केला. आता विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. विशेषत: अकोला पश्चिमसह बाळापूर मतदारसंघ भाजपसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा : अमरावती : यंदाही अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता
अकोला पूर्वचा मोठा हातभार; आ. सावरकरांची रणनीती
भाजपचे अनुप धोत्रे यांच्या विजयात अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचा मोठा हातभार राहिला आहे. भाजपला सर्वाधिक ८७ हजार ८११ मते अकोला पूर्वमध्ये पडली. ६० हजार ३३४ मते घेऊन दुसऱ्या स्थानावर वंचित राहिली. भाजपला २७ हजार ४७७ मतांची आघाडी मिळाली. अकोला पूर्वचे भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून भाजपची अकोल्याची जागा कायम राखण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलला. बदलत्या समीकरणात आ. सावकररांची रणनीती यशस्वी ठरली. जिल्ह्यामध्ये पक्षातील त्यांच्या वर्चस्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.