अकोला : पुणे-अजनी साप्ताहिक विशेष गाडीच्या १४ फेऱ्या धावणार असून एलटीटी-बल्हारशाह विशेष रेल्वेच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. ०२१४१ पुणे-अजनी साप्ताहिक विशेष गाडी पुण्यावरून १७ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत दर मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४.५० वाजता अजनीला पोहोचेल. ०२१४२ अजनी-पुणे अजनी येथून १८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान दर बुधवारी सायंकाळी ७.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पुणे जंक्शनला पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : महाकाली मातेच्या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात

या गाडीला तीन वातानुकूलित टू टियर, १५ वातानुकूलित थ्री टियर आणि दोन जनरेटर कार अशी रचना राहणार आहे. ०११२७ एलटीटी-बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडी १४ नोव्हेंबरपर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित करण्यात आली होती, ती गाडी आता २१ आणि २८ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ०११२८ बल्हारशाह साप्ताहिक विशेष १५ नोव्हेंबरऐवजी आता २२ आणि २९ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola ltt balharshah express and pune ajni express these 2 special trains will run till november 28 ppd 88 css
Show comments