अकोला : ‘शरद पवार यांनी एखाद्यावर विश्वास टाकल्यास त्याला दिलेल्या जबाबदारीत किंवा कामामध्ये ते कधीही हस्तक्षेप करीत नाहीत. पक्षामध्ये देखील शरद पवार यांनी एवढी मोकळीक दिली की परिस्थितीच बिघडून गेली’, अशी मिश्कील टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली. शरद पवारांसमोरच जाहीर सभेत जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अकोल्यात गुरुवारी आयोजित सहकार महर्षी कै. डॉ.वा.रा. कोरपे जन्मशताब्दी महोत्सव समारोप व सहकार महामेळावा खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षस्थानाखाली पार पडला. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

हेही वाचा : शरद पवार स्पष्टच म्हणाले, ‘भाजपसोबत जाण्याला आमची कधीही सहमती नव्हती, अजित पवार मुख्यमंत्री होणे, हे एक स्वप्न…’

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
Sharad Pawar on ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
Ajit Pawar on a secret Adani Amit Shah meeting
राजकीय निर्णयात उद्योगपतींचा सहभाग नसतो!
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा

या कार्यक्रमात कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी.डी.मायी यांनी शरद पवार यांच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेत काम करीत असतांना शास्त्रज्ञांच्या नियुक्तीमध्ये शरद पवार यांनी कधी हस्तक्षेप किंवा कुठलेही नाव सूचवले नसल्याचे मायींनी सांगितले. त्यांची री ओढत आ.जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी विश्वास दाखवल्याने काम करण्याची संधी मिळाली. एकदा विश्वास टाकला तर त्याच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही, ही शरद पवार यांची भूमिका आहे. २००४ अगोदर देश २५ लाख क्विंटल कापूस आयात करीत होता. शरद पवार यांच्या १० वर्षांच्या कृषिमंत्र्यांच्या कार्यकाळानंतर ७० लाख क्विंटल कापूस निर्यात करणारा भारत देश ठरला. गेल्या १० वर्षांत पुन्हा परिस्थिती खालावली आणि आता पुन्हा कापूस आयात करण्याची वेळ शासनाने आणली, अशी टीका त्यांनी केली.