अकोला : मानव आपल्या सोयीनुसार विविध वसाहती थाटत असतो. मात्र, शहरातील एका इमारतीवर चक्क ‘पाकोळी’ पक्षांनी आपली स्वतंत्र वसाहत साकारली आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी पक्षांची वसाहत आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.

नकाशा मंजुरी, नगर रचना विभागाचे बांधकाम परवाना पत्र, बांधकाम साहित्याची जमवाजमव, बँकेचे कर्ज, स्थापत्य अभियंता, रखवालदाराचा शोध आदी अनेक किचकट व कायदेशीर प्रक्रियेतून गेल्यावर मानवाला आपले निवासस्थान उभारता येते. मात्र, निसर्गदूत पक्षांना या कशाचेही बंधन नाही. तो खराखुरा स्वत:च्या जीवनाचा शिल्पकार असतो. शहरातील नवीन खेतान नगर येथील चिमणलाल रामप्रसादजी भरतीया शाळेच्या इमारतीवर रेषाधारी कंठ पाकोळी पक्षांनी जवळपास ७० फूट लांब आपली सुंदर वसाहत साकारली. उद्योगपती दीपक भरतीया यांनी मातापित्यांच्या स्मरणार्थ देणगी देऊन शाळेचे नुतनीकरण केले. नव्या बांधकामाच्या उंचीवर पक्षांना आपला ‘प्लॉट’ आवडला. त्यांना घरकुल बांधकामासाठी लागणारे साहित्य ओली चिकण माती, पिसे, स्वत:ची लाळ परिसरात मुबलक असल्यामुळे त्यांना वसाहत उभारणे सोयीस्कर झाले.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?

हेही वाचा – यवतमाळ जिल्ह्यात खुनाच्या ७८ घटना, ८६ जणांचा मृत्यू, २१४ आरोपींना अटक!

बहिणाबाईंनी बया पक्षाच्या घरटी विणण्याच्या कलेचे कौतुक आपल्या काव्यातून केलेले आहे. इतर अनेक पक्षीही स्वत:ची घरटी तयार करून आपली वीण घालतात. त्यातलेच हे पाकोळी पक्षी. पाकोळ्यांच्या घरटी बांधण्याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला असता त्यांना असे आढळून आले की पाकोळी पक्षी आपल्या चोचीत चिकण माती आणताना १२०० फेऱ्या मारतो. तेव्हा त्याचे घरटे आकार घेते. या ठिकाणी तर भव्य वसाहत उभारताना पक्षांच्या चमूने सामूहिक श्रमदान करून बांधकामाचा एक नमुनाच पेश केला आहे, अशी माहिती ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांनी दिली. पाकोळ्यांच्या या घरट्यांविषयी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रचंड कुतुहल आहे. घरटी उंचावर असल्याने अनेकवेळा पिल्ले आवारात पडून मृत्युमुखी पडतात. याचे वाईट वाटते, असे शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी कुळकर्णी यांनी सांगितले.

पक्षांना इंग्रजी साहित्यात मानाचे स्थान

पाकोळी पक्षी रॉकेटसारख्या शरीराच्या आकारामुळे आकाशात खालीवर, बाजुला सहज सुळकांड्या मारून आजूबाजूला उडणारे किडे किटक टिपतात. पाकोळीच्या अद्भूत अशा गगनविहारीवर पाश्चिमात्य कवींनी पाकोळ्यांवर मुबलक कविता रचल्या आहेत.

हेही वाचा – ‘विदेशातील रुग्णांनी भारतात उपचार घ्यावे’, कोण म्हणतंय जाणून घ्या

पाकोळी पक्षी मुख्यत: रेल्वेपुलाखाली तळ्याजवळच्या कमानीला, जुन्या उंच इमारतींमधील आडोशाला मुबलक घरटी करतो. मऊ चिखल आणि तोंडातील लाळेच्या सहाय्याने एक प्रकारचे सिमेंटसारखे चिवटमिश्रण तयार करून त्यामध्ये पिसे घेऊन घरटी बांधतात. या अनोख्या निसर्गदुताने अकोल्यात साकारलेली वसाहत आणि त्यांच्या नभातील आकर्षक कवायती आपल्याला सुखावतात. – दीपक जोशी, ज्येष्ठ पक्षीमित्र, अकोला.