अकोला : अजमेर येथील ८१२ व्या उर्स उत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी हैदराबाद – अजमेर व काचीगुडा – मदार विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांवर मात्र विशेष भाड्याचा अतिरिक्त भार पडेल. नांदेड, अकोला, खंडवा, भोपाळ, रतलाम, चितोडगढ मार्गे धावणारी गाडी क्र. ०७१२५ हैदराबाद – अजमेर विशेष १५ जानेवारीला हैदराबादवरून १५.०० वाजता सुटेल व बुधवारी अजमेरला सकाळी ०८.३० वाजता पोहचेल. गाडी क्र. ०७१२६ अजमेर – हैदराबाद विशेष २० जानेवारीला अजमेरवरून ०५:३० वाजता सुटेल व रविवारी हैद्राबादला दुपारी १५:३० वाजता पोहचेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘एटीएम’ चोरी प्रकरणी दोन आरोपी ‘तिजोरी’सह पकडले! जालना येथे केले जेरबंद; विशेष पथक रवाना

गाडी क्र. ०७१२९ काचीगुडा – मदार विशेष १५ जानेवारीला काचीगुडावरून २३:४५ वाजता सुटेल व बुधवारी मदारला १७:४५ वाजता पोहचेल. गाडी क्र. ०७१३० मदार – काचीगुडा विशेष २० जानेवारीला मदारवरून १:४० वाजता सुटेल व सोमवारी काचीगुडाला सकाळी ०४:३० वाजता पोहोचेल.