अकोला : पती व पत्नीमध्ये प्रेम, विश्वास व जिव्हाळ्याचे नाते असते. हे नाते साताजन्माचे असल्याची भावना भारतीयांच्या मनात आहे. ६० वर्षांच्या संसारात अतूट प्रेम असलेल्या पती व पत्नीने अवघ्या आठ तासाच्या अंतरात जगाचा निरोप घेतल्याचा अतिशय भावनिक व दुःखद प्रसंग जिल्ह्यातील बाळापूर शहरात घडला. वयस्कर दाम्पत्यामधील प्रेमामुळे मृत्यू देखील त्यांची ताटातूट करू शकला नाही. अतूट प्रेमाच्या भावनेमुळेच त्यांनी एकत्रितपणे जगातून निरोप घेतल्याची चर्चा मृत्यूनंतर होत आहे.

जिल्ह्यातील बाळापूर शहरात गुजरातीपूरा भागामध्ये रमेशसिंग करणसिंग गौतम (८२) यांचे राहणे होते. दीर्घ आजारामुळे रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले, तर पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी पद्माबाई (७६) यांनी देखील पहाटे अंतिम श्वास घेतला. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या आठ तासातच पत्नीने देखील हे जग सोडले. लग्नानंतर ६० वर्ष वैवाहिक आयुष्याचा प्रवास एकत्र केल्यानंतर दोघांनी काही वेळाच्या अंतरातच जगाचा निरोप घेतला. रमेशसिंग आणि पद्माबाई या दोघांची पहिली भेट त्यांच्या पाहणीच्या कार्यक्रमात झाली होती. त्यावेळी पती २२, तर पत्नी १६ वर्षांच्या होत्या.

Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor wedding
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
Couples who are ineligible for marriage due to age restrictions are eligible to live-in
वयाच्या अटीमुळे लग्नास अपात्र जोडपे लिव्ह-इन करता पात्र!
Marathi Actress Hemal Ingle Wedding photo
साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हेमल इंगळेने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ! पती आहे कलाविश्वापासून दूर…; फोटो आले समोर
Lakshmi Niwas Fame Divya Pugaonkar marriage invitation card
‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकरची लगीनघाई! शेअर केली लग्नपत्रिकेची खास झलक, २०२१ मध्येच पार पडलेला तिलक समारंभ
child marriage raigad
बालविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच बालविवाहांचा अंतरपाट
Remarried widows also have inheritance rights
पुनर्विवाहित विधवेसही वारसाहक्क!

हेही वाचा : नागपुरातील ‘हिट अँड रन’ प्रकरणात आरोपी महिलेला जामीन नाहीच, उच्च न्यायालयाने…

पद्माबाई यांचे माहेर धुळे जिल्ह्यातील होते. रमेशसिंग हे मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी होते. कुटुंबातील वरिष्ठांनी दोघांचे मोठ्या थाटात लग्न लावून दिले होते. लग्नानंतर दोघांचाही संसार आनंदाने फुलला. संसाररुपी वेलीवर दोन मुले आणि दोन मुली अशी फुले उमलली. मुलांचे पालपोषण त्यांचे शिक्षण यामध्ये आयुष्याची अनेक वर्ष निघून गेली. कालांतराने मुल-मुली मोठे झाल्यावर त्यांची लग्न झाली. नातवंडांच्या रूपाने जीवनात आणखी आनंद आला. आयुष्यात सुख समाधान होते. संपूर्ण आयुष्य बाळापूरसारख्या लहान शहरात गेले. ६० वर्षांचा दीर्घकाळ एकमेकांसोबत आनंदी संसारात गेला. वयोमानानुसार आरोग्याची कुरबुरी सुरू झाली. दीर्घ आजापणामुळे पतीचे निधन झाले.

हेही वाचा : अकोला : कपाशीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’, काळ्या बाजारात दुप्पट दराने विक्री

पती रमेशसिंग यांचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नी पद्माबाई यांना मोठा धक्का बसला. या धक्क्यातून त्या सावरू शकल्या नाहीत. पतीच्या निधनानंतर अवघ्या आठ तासातच पत्नी पद्माबाई यांनी आपला जीव सोडला. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बाळापुरात दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दु:खद प्रसंगी अनेकांचे डोळे पाणावले होते. पती व पत्नीमध्ये खूप प्रेम होते, असे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. याची बरीच चर्चा आहे.

Story img Loader