अकोला : पती-पत्नीच्या वादात चिमुकल्या मुलीचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरात उघडकीस आला आहे. आईनेच पोटच्या मुलीची हत्या केल्याचे पोलीस तपासात तब्बल दोन महिन्यानंतर समोर आले. या प्रकरणाची तक्रार मुलीच्या वडिलांनीच केली होती. उत्तरीय तपासणी अहवालातून हत्येचा उलगडा झाला. शहरातील बलोदे लेआऊट येथील रहिवारी आमले दाम्पत्यामध्ये लग्नापासून वाद होते. पत्नीने पतीला घटस्फोटाची मागणी देखील केली होती.
हेही वाचा : घरबसल्या काम करत नफा कमावायला गेली आणि लग्नासाठी जमवलेली रक्कम एका क्लिकवर गमावली
दरम्यान, नाकाला चिमटा लावून साडेपाच वर्षीय चिमुकली किशोरी झोपली आणि तिचा मृत्यू झाला, असा बनाव तिच्या आईने केला होता. तिचे वडील रवी आमले यांना संशय आल्याने त्यांनी पोलीस तक्रार केली. पोलिसांनी उत्तरीय तपासणी केली. त्यामध्ये चिमुकलीच्या मृत्यूचा बनाव केल्याचे उघडकीस आले. मुलीच्या अंगावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. या प्रकरणी चिमुकलीची आई विजया आमले हिच्या विरोधात हत्येचा गुन्हा खदान पोलिसांनी आज नोंदवला. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.