अमरावती : मेळघाटातील सेमाडोह नजीक एसटी महामंडळाची बस खोल दरीत कोसळून झालेल्‍या अपघातात दोन महिलांचा मृत्‍यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सकाळी ११.३० वाजताच्‍या सुमारास घडला. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्‍याने हा अपघात झाल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती वरून निघालेली परतवाडा आगाराची एम एच ०७ / ९४७८ क्रमांकाची बस परतवाडा घटांग, सेमाडोह मार्गे तूकईथड येथे जात असताना हा अपघात झाला. सेमाडोह नजीक जवाहर कुंड येथे ही बस सुमारे ३० फूट खोल दरीत कोसळली. इंदू समाधान गंत्रे (६५, रा. साठमोरी, खकनार, म.प्र.) , ललिता चिमोटे (३०, रा. बुरडघाट) अशी मृत महिलांची नावे आहेत. अपघातातील जखमींना सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्‍यात आले आहे.

हेही वाचा…अमरावतीत महायुतीच्‍या उमेदवारीचे त्रांगडे; देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंनी स्पष्ट सांगितले, तरीही…

आरोग्य यंत्रणेच्या वतीने तत्काळ जखमींना रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्‍यात आले. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच राजेश सेमलकर ओमप्रकाश तिवारी सुनील येवले शिवा काकड प्रदीप सेमलकर, लाला कासदेकर बाबू दहीकर असे सेमाडो येथील अनेक जण मदतीला धावले. घटनास्थळी चिखलदरा पोलीस पोहोचले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amaravati st bus accident in melghat near semadoh two dead 25 injured mma 73 psg