लोकसत्‍ता टीम

अमरावती: अचलपूरचे आमदार बच्‍चू कडू यांच्‍या नेतृत्‍वातील पॅनलला चांदूर बाजार कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत वर्चस्‍व राखण्‍यात यश मिळाले असले, तरी अचलपुरात मात्र हादरा बसला आहे.

yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

चांदूर बाजारमध्‍ये सत्ता आणण्यासाठी कॉंग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष बबलू देशमुख यांनी कंबर कसली होती. पण माजी राज्यमंत्री, आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’समोर त्याचा टिकाव लागू शकला नाही. बच्चू कडूंच्या शेतकरी पॅनलने एकहाती सत्ता मिळवली. १८ पैकी १६ जागा जिंकून बच्चू कडूंनी विरोधकांना धूळ चारली आणि आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. दोन अपक्षांनी या निवडणुकीमध्ये बाजी मारली. बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने खातेही उघडले नाही.

हेही वाचा… महाराष्ट्रदिनी मोठा घातपात घडवण्याची होती योजना! अबुझमाडवरून दोन दिवसांपूर्वीच परतला कुख्यात ‘बीटलू’

अचलपुरात मात्र बबलू देशमुख यांच्‍या सहकार पॅनेलला सत्‍ता हस्‍तगत करण्‍यात यश मिळाले. त्‍यांच्‍या पॅनलने आमदार बच्‍चू कडू यांच्‍या प्रहारला धक्‍का दिला. सहकार पॅनलला १८ पैकी १५ जागांवर विजय मिळाला. बच्‍चू कडूंच्‍या नेतृत्‍वातील शेतकरी पॅनलला केवळ तीन जागा मिळाल्‍या.

वरूड बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत खासदार अनिल बोंडे व काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या सहकार पॅनलने सत्ता मिळविली आहे. सहकार पॅनलचे १५ उमेदवार निवडून आले. या ठिकाणी सत्ता कायम ठेवण्यात काँग्रेसला यश आले. या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार व माजी सभापती गिरीष कराळे यांच्या शेतकरी परिवर्तन गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.

हेही वाचा… “राज्यातील ८ कोटी जनतेला मोफत उपचार देणार”, फडणवीसांनी दिली माहिती; जाणून घ्या नेमकी योजना कोणती?

धामणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत शेतकरी सहकार पॅनलचा दबदबा पहावयास मिळाला. १८ पैकी १६ जागांवर विजयी मिळवीत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात लढलेल्या शेतकरी सहकार पॅनलने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. भाजपाचे आमदार प्रताप अडसड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय भैसे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा केवळ एक तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. माजी आमदारांनी विद्यमान आमदारांना पराभवाची चव चाखायला लावली.

हेही वाचा… यवतमाळ : बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व; पालकमंत्री संजय राठोड यांनी दारव्हा राखले

दर्यापूर बाजार समितीत जिल्‍हा बँकेचे अध्‍यक्ष व कॉंग्रेसचे नेते सुधाकर भारसाकळे, आमदार बळवंत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर यांच्‍या नेतृत्‍वातील सहकार पॅनेलचे १४ संचालक निवडून आले. भाजपाचे आमदार प्रकाश भारसाकळे, माजी आमदार रमेश बुंदिले, अरुण पाटील गावंडे यांच्‍या नेतृत्‍वातील शेतकरी किसान पॅनलचे ३ उमेदवार विजयी ठरले, तर १ अपक्ष उमेदवार निवडून आला.

धारणी बाजार समितीत आठ उमेदवार अविरोध निवडून आले होते, तर दहा जागांसाठी झालेल्‍या निवडणुकीत सर्वपक्षीय शेतकरी पॅनलने वर्चस्‍व प्रस्‍थापित केले. सर्वसाधारण सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून या पॅनलचे सातही उमेदवार निवडून आले.

Story img Loader