अमरावती: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीची पत्नीने आपल्या वडिलांच्या मदतीने गळा आवळून हत्या केली. ही घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसखेड येथे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि सासऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमोल रमेश काकडे (३२, रा. पळसखेड) असे मृताचे नाव आहे. अमोलची ३० वर्षीय पत्नी आणि सासरे भगवंत सहदेव राऊत (६०) दोघेही रा. पळसखेड, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी प्रफुल्‍ल रमेश काकडे (३०, रा. अमरावती) यांनी दिलेल्‍या तक्रारीनुसार, अमोल यांच्या पत्नीचे एका परपुरुषासोबत अनैतिक संबंध होते. याबाबत अमोलला माहिती मिळाली. या कारणावरून अमोल व त्यांच्या पत्नीमध्ये नेहमी वाद व्‍हायचे.

हेही वाचा… नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना पैशांची मागणी; विमा कंपन्यांकडून अडवणूक

दरम्यान, पती अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे पत्नीने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार तिने वडिलांच्या मदतीने अमोल यांची गळा दाबून हत्या केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्­ही आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.