अमरावती : सध्याच्या तरुणाईला साहसी खेळ किंवा साहसी प्रकार अधिक आवडतात. त्यामुळेच सुट्टीच्या काळात या तरुणाईची पावले ट्रेकिंग, दुर्गभ्रमंती, जंगलभ्रमंती करण्याकडे वळतात. महाराष्‍ट्रात अशी ठिकाणे तुरळक आहेत. पण, आता चिखलदरा या पर्यटनस्‍थळी ही संधी उपलब्‍ध झाली आहे.

चिखलदरा येथील भीमकुंड धबधबा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पर्यटकांना आता ‘स्‍काय सायकल’चा वेगळा आनंद घेता येणार आहे. या शिवाय ‘जायंट स्‍वींग’ म्हणजे दरीच्‍या काठावरून उंच झोक्‍याचा रोमांच पर्यटकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘झीपलाईन’, ‘जायरो राईड’, ‘रॅपलिंग’ हे साहसी प्रकारही पहायला मिळणार आहेत.

water pipe bursts in Dombivli
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली;  पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
problem of potholes on Khopta bridge to Koproli road will cleared soon
खोपटे पूल ते कोप्रोली मार्ग लवकरच खड्डेमुक्त, एक किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सात कोटींच्या निधीस मंजुरी
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत

हेही वाचा : अकोला : लाडकी बहीण योजना; बँक खाते ‘आधार सिडिंग’ आहे का? योजनेच्या लाभासाठी…

विदर्भातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्‍या चिखलदरा येथे वर्षभर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विशेषत: पावसाळ्यात डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांचे निसर्ग, मन मोहून टाकणारे धुके आदी सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक उत्साहाने चिखलदरा नगरीत येतात. चिखलदरा येथील भीमकुंड पॉइंटवर साहसी खेळ प्रकल्‍पाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा नुकताच जिल्‍ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍या उपस्थितीत पार पडला.

चिखलदऱ्यापासून ५ किमी अंतरावर असलेल्या आमझरी पर्यटन संकुलात इतर साहसी उपक्रम राबवले जात आहेत. पर्यटन संकुल ते मेंढादेव धबधबा असा ३.५ किमीचा निसर्ग मार्गही विकसित केला जात आहे. या ठिकाणी एक रॅपलिंग देखील राहणार आहे. आमझरी येथील निसर्ग पर्यटन संकुलात स्थानिक २० युवक-युवतीव्दारे साहसी खेळ चालविण्यात येत आहे. हे ठिकाणही आता लोकप्रिय होऊ लागले आहे.

हेही वाचा : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यावरून काँग्रेस आक्रमक, आयोग म्हणाले परीक्षा पुढे….

गेल्या पाच वर्षांत मेळघाटात पर्यटकांची संख्या वाढली असून, २०१७-१८ मध्ये, ५४ हजार ५०० पर्यटकांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आणि त्यातून ७१.८१ लाख रुपयांची कमाई झाली. २०२२-२३ मध्ये पर्यटकांची संख्या १.६७ लाखांवर गेली असून, ३.२० कोटींहून अधिक कमाई झाली आहे.

चिखदऱ्यातील पर्यटकांना व निसर्गप्रेमींना आकर्षित करण्यासाठी वनविभाग व स्थानिक प्रशासनाव्दारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आमझरी येथे ‘निसर्ग पर्यटन संकुल’ व खटकाली येथील ‘प्रकाश होम स्टे’, गावीलगड वन्यजीव परिक्षेत्रातील ‘निसर्गानुभव मचाण’ व भीमकुंड येथील ‘साहसी खेळ’ अशा उपक्रमामुळे येथे निश्चितच पर्यटकाच्या संख्येत वाढ होऊन स्थानिकांना रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होईल. यामुळे स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ होऊन राज्याच्या महसुल वाढण्यास निश्चितच मदत होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Story img Loader