अमरावती : मेळघाटातील राजदेवबाबा हे ठिकाण वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. आदिवासी लोक या ठिकाणी मुर्तीला श्रद्धेपोटी तंबाखू, विडीचा नैवेद्य अर्पण करतात. ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हा संशोधनाचा विषय झाला आहे. चिखलदरा तालुक्‍यातील खोंगडा गावापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोट ते धारणी फाट्यावर राजदेवबाबाची मूर्ती आहे. याच राजदेवबाबांना विडीवाले बाबा या नावाने ओळखले जाते. येथील आदिवासी कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी याठिकाणी विडी, तंबाखूचा नैवेद्य अर्पण करतात.

विशेष म्हणजे, लग्नाची पहिली पत्रिका राजदेवबाबांच्या चरणी अर्पण केली जाते. याठिकाणी भेट देणारा प्रत्येक जण श्रद्धेपोटी राजदेवबाबाला विडी, तंबाखू, सिगारेटचा नैवेद्य अर्पण करतो. त्यामुळे राजदेवबाबांच्या मुर्तीच्‍या मुखात नेहमी विडी, सिगारेट पाहायला मिळते. अवतीभवती विविध प्रकारच्या तंबाखू, गुटख्याच्या पुड्या दिसून येतात.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?
Shah Rukh Khan quits smoking at the age 59
शाहरुख खानने वयाच्या ५९ व्या वर्षी सोडले धूम्रपान; जाणून घ्या धूम्रपान सोडण्याचे फायदे
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : हीच ‘सप्रेम इच्छा’अनेकांची!

हेही वाचा : महाराष्ट्रातील वलयांकित वाघ नेमके गेले कुठे?; मृत्यू की शिकार हे गुलदस्त्सात; वनखात्याकडे नोंदच नसल्याने संभ्रम

आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले राजदेवबाबा खरोखरच विडी पितात काय? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, मेळघाट दर्शन करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना विडीवाले बाबांच्या ठिकाणाला भेट देण्याची कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून येते.