अमरावती : अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी चढवलेल्या हल्ल्यात ३० ते ४० जण जखमी झाले आहेत. ही घटना अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा शंभू या गावात शनिवारी दुपारी घडली. मधमाशांच्या हल्ल्यानंतर नागरिकांची चांगलीच पळापळ झाली होती. टाकरखेडा शंभू या गावातील मोहन लक्ष्मण टवलारे (५५) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे दुपारी त्यांच्या अत्यंसंस्काराला गावातील तसेच बाहेरगावातील नागरीक हजर झाले होते. गावातील अंबराई येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच अचानक मधमाशांनी हत्ला चढविला. त्यामुळे अंत्यंविधी मध्येच सोडून नारीकांनी पळ काढला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागरीक सैरावैरा पळू लागले. काहींनी नजिकच्या तुरीच्या शेतात आडोसा घेतला. त्यामुळे ते बचावले. काही वेळानंतर मधमाशा निघून गेल्याने अंत्यविधी पूर्ण करण्यात आला. मात्र तोपर्यंत या हल्ल्यात ३५ ते ४० जण जखमी झाले होते. काहींनी गावातीलच डॉक्टरकडे धाव घेतली तर काही जण तातडीने वलगाव, अमरावती येथील खासगी रूग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा