अमरावती : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्‍या अमेरिकेतील आरक्षणासंदर्भातील विधानावर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून शहरातील भाजपच्‍या नेत्‍यांनी राहुल गांधी यांच्‍या प्रतिमेला जोडे मारून आणि प्रतिमा जाळून निषेध व्‍यक्‍त केला.

येथील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्‍या विरोधात आंदोलन करून घोषणाबाजी करण्‍यात आली. नंतर राहुल गांधी यांच्‍या प्रतिमेची जाळपोळ करण्‍यात आली. आरक्षणविरोधी भूमिका कॉंग्रेसने घेऊ नये, अन्‍यथा भाजप त्‍यांना फिरू देणार नाही, असा इशारा भाजप अनुसूचित जाती सेलचे सिद्धार्थ वानखडे यांनी दिला. यावेळी भाजपचे प्रवक्‍ते शिवराय कुळकर्णी उपस्थित होते.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Dhananjay munde latest marathi news
भाजपमधील दुखावलेले कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याचे धनंजय मुंडेंसमोर आव्हान
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
BJP, Vanchit bahujan aghadi, Murtizapur constituency
मूर्तिजापूरमध्ये भाजप व वंचितमध्ये लढा, राष्ट्रवादीला बंडखोरी व अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे

हे ही वाचा…वर्धा : हिंगणघाटच्या वैद्यकीय महाविद्यालयाची जागा अखेर ठरली, प्रवेशाबाबत ..

भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करु, असे राहुल गांधी म्हणाले होते. अमेरिकेत राहुल गांधींनी आरक्षणावरुन हे वक्तव्य केले, मात्र त्यांच्या या वक्तव्याचे देशात आता पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी पक्षाने त्यांना यावरून कोंडीत पकडण्‍याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करीत आहेत. आरक्षण विरोधी काँग्रेसचा चेहरा समोर आला असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मतांसाठी आरक्षणावरुन कसा खोटा नॅरेटिव्ह केला हे राहुल गांधींच्या वक्तव्यातून दिसले असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसची खरी आणि संविधान विरोधी भूमिका राहुल गांधींच्या तोंडून आता समोर आली आहे, अशी टीका भाजपच्‍या नेत्‍यांनी केली आहे. त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याचा भाजपकडून राज्‍यभर निषेध केला जात आहे.

हे ही वाचा…विधानसभा निवडणुकीत स्पर्धा परीक्षार्थींचा कौल, या पक्षाला मोठा धक्का…

दरम्‍यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा चुकीचा अर्थ काढून भारतीय जनता पक्ष त्यांच्या अंगभूत सवयीप्रमाणे खोटा प्रचार करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाला भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानत नाही. आरक्षणाला संघाचा विरोध आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे, अशी जाहीर वक्तव्ये केलेली आहे. त्यामुळे भाजपाने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांचा आरक्षणविरोधी चेहरा लपवू शकत नाहीत, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.