अमरावती : आजीसोबत एका धार्मिक कार्यक्रमाला जात असलेल्या चुलत बहीण-भावाला शहर बसने धडक दिली. या अपघातात बसच्या चाकाखाली चिरडून भावाचा मृत्यू झाला. तर बहीण जखमी झाली. अपघानंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायन्सकोर प्रांगणाच्या प्रवेशद्वारासमोर घडली. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रितम गोविंद निर्मळे (९) असे मृतक तर वैष्णवी संजय निर्मळे (१२) असे जखमी मुलीचे नाव आहे. शिरजगाव कसबा येथील रहिवासी नर्मदा लक्ष्मणराव निर्मळे (६०) ह्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रविवारी सकाळी नातू प्रितम, नाती वैष्णवी व नेहा संतोष निर्मळे (१४) यांच्यासह एसटी बसने अमरावतीला आल्या. मध्यवर्ती बसस्थानकावर उतरल्यावर ते सर्व पायदळ सायन्सकोर प्रांगणाच्या द्वारासमोरून रुक्मिणीनगर चौकाकडे धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनस्थळी जात होते. त्यावेळी मागून आलेल्या शहर बस क्रमांक एमएच २७ ए ९९५२ ने अचानक प्रितम व वैष्णवीला धडक दिली. या अपघातात प्रितम हा बसच्या चाकाखाली आला. त्यात चिरडून त्याचा करुण अंत झाला. तर वैष्णवी ही जखमी झाली. अपघातानंतर आजी नर्मदा यांनी एकच आक्रोश केला. तर संतप्त जमावाने बसची तोडफोड केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. याबाबत माहिती मिळताच कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पोलिसांनी जखमी वैष्णवीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा : ज्येष्ठांना त्रास देऊ नका…आमच्या मागण्यांसाठी आताच जागे व्हा, अन्यथा
पैशांसाठी तगादा; महिलेची आत्महत्या
मुलीच्या लग्नासाठी नातेवाइकाकडून १० हजार रुपये उसणे घेतले होते. दरम्यान महिलेने त्यापैकी तीन हजार रुपये परतही केले. मात्र सात हजार रुपये बाकी होते. विशेष म्हणजे ज्याच्याकडून रक्कम उघार घेतली त्या नातेवाइकाने तगादा लावला नाही, मात्र त्याच्या दोन नातेवाइकांनी महिलेला सात हजार रुपयांसाठी तगादा लावला. त्यामुळे महिलेने आत्महत्या केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध शिरजगाव कसबा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : विधान परिषद निवडणुकीत आमची नाही तर काँग्रेसची…
अलका दिलीप बेठे (४०, रा. इंदिरानगर, करजगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी राजा सुंदरलाल घोटे (३८) आणि राजू सुंदरलाल घोटे (३५, दोघेही रा. इंदिरानगर, करजगाव) यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलका यांचे पती दिलीप बेठे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. काही वर्षांपूर्वी अलका व दिलीप यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी नात्यातच असलेल्या राजू व राजा यांचा भाऊ सुंचा घोटे यांच्याकडून दहा हजार रुपये उसणे घेतले होते. त्यापैकी तीन हजार परत केले. मात्र आर्थिक अडचणींमुळे बेठे दाम्पत्याला उर्वरित ७ हजार देणे शक्य झाले नव्हते.