अमरावती : दहाव्या वर्गात‎ शिकणाऱ्या मुलीच्या हातातील‎ मोबाइल घेऊन वडिलांनी तो खाली‎ आपटला. त्यामुळे मोबाईल फुटला.‎ मोबाईल फोडल्याचा राग मनात‎ धरून दहाव्या वर्गात शिकणारी १५‎ वर्षीय मुलगी घरातून निघून गेली. या‎ प्रकरणी कुटुंबीयांनी तळेगाव‎ पोलिसांत तक्रार दिली असून‎ पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे.

पंधरा वर्षीय मुलगी सायंकाळी घरीच मोबाईल पाहत‎ होती, त्यावेळी तिच्या भावाने तो मोबाईल मागितला. मात्र, मुलीने‎ काही त्याला मोबाईल दिला नाही.‎ त्यावेळी मुलीचे वडील त्या ठिकाणी‎ आले व त्यांनी मुलीच्या हातातून‎ मोबाईल हिसकला आणि तो‎ जमिनीवर आपटल्‍याने फुटला. मोबाईल‎ फोडल्‍यामुळे मुलीला राग आला व‎ हाच राग मनात धरून ती घरातून‎ बाहेर पडली.

two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Image of Wepons
Online Bomb Making : घटस्फोटाचा बदला घेण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य; बॉम्बचं इंटरनेवरून प्रशिक्षण घेऊन चक्क स्फोट घडवून आणला!
Young people facing mental health problems prevalence of mental stress is highest among youth aged 18 to 25
सर्वाधिक मानसिक ताण १८ ते २५ वयोगटातील तरुणांवर! जाणून घ्या नेमकी कारणे…
Schoolboy commits suicide after not getting mobile phone sangli
सांगली: मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या
16-year-old boy runs away from home after mother gets angry over mobile phone use
पालकांनो सावध व्हा… मोबाईलचे व्यसन मुलांसाठी ठरू शकते घातक; वाचा काय घडलं ते…

हेही वाचा – नागपूर : पतीच्या अनैतिक संबंधाने विस्कटलेला संसार पुन्हा रुळावर! भरोसा सेलच्या प्रयत्नांना यश

ती बराच वेळ घरी न‎ आल्यामुळे कुटुंबीयांना तीच्या‎ मैत्रिणींकडे तसेच गावात तिचा शोध‎ सुरू केला, मात्र ती काही दिसली‎ नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी‎ शोधमोहीम सुरूच ठेवली. दरम्यान,‎ बस थांब्‍यावर विचारणा केली असता‎ ती चांदूर रेल्वे मार्गाने पायी गेल्याचे‎ सांगण्यात आले. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला आहे.

Story img Loader