अमरावती : मेळघाटातील घुटी गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्‍याने झालेल्‍या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्‍यू झाला. मृतांमध्‍ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी ४ वाजताच्‍या सुमारास घडला. दादू भब्‍बा दारशिंबे (२७, रा. सावऱ्या), दादू याची पत्‍नी शारदा दारशिंबे (२४) आणि त्‍यांची दोन लहान मुले या अपघातात ठार झाली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

होळीच्या सणानिमित्त दारशिंबे कुटुंबातील चार जण दुचाकी वाहनाने धारणी शहरात होळी सणानिमित्‍त बाजार करण्यासाठी आले होते. बाजारातील साहित्‍य खरेदी करून हे कुंटुंब आपल्या मूळ गावी सावऱ्या येथे परतीच्या मार्गावर होते. घुटी गावाजवळ एमएच २९ / ऐ आर १४५६ या चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दादु भब्बा दारशिबे, शारदा दारशिबे व त्यांची दोन मुले जागीच ठार झाले.

हेही वाचा : रामटेकमध्ये सेनेला भाजपकडून उमेदवार

सावऱ्या येथील गावकऱ्यांची होळी काळी ठरली आहे. सध्या मेळघाटातील सर्वच गावांमध्‍ये होळी सणाची लगबग सुरू आहे. साहित्य खरेदीसाठी खेड्यातील लोक बाजार करण्यासाठी धारणीच्या बाजारपेठेत येत असतात. दारशिंबे हे आपल्या दुचाकी वाहनाने धारणीत आले होते. बाजार करून परत गावाकडे जात असताना हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन बालके दुचाचाकी वाहनाच्या समोर पेट्रोल टाकीवर बसले होते. कारची धडक एवढी जबर होती की, चारही जण दुचाकीवरून दूर फेकले गेले आणि जागीच ठार झाले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास धारणी पोलीस करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati four persons of the same family died in accident at melghat mma 73 css