अमरावती : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला मुलगा मानले होते. पंकजा मुंडे या माझ्या बहीण आहेत. माझ्या पक्षाचे १४५ आमदार निवडून आले, तर मी नक्‍कीच पंकजा मुंडे यांना मुख्‍यमंत्री करेल, अशी घोषणा राष्‍ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी येथे प्रसार माध्‍यमांशी बोलताना केली.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीला केवळ एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर सध्या पक्षबांधणीसाठी जनस्वराज्य यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत. अशातच त्यांनी आगामी निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

हेही वाचा : एकल बेलदार समाजाचे २४ नोव्हेंबरपासून नागपुरात उपोषण; मागण्या काय? जाणून घ्या….

आम्हाला भाजपमध्ये पक्ष विलीन करा असे सांगण्‍यात आले होते. पण आम्ही पक्ष विलीन केला नाही. आम्ही होतो म्हणून भाजपचे सरकार आले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला कोणी ओळखत नाही. भाजप हा छोट्या छोट्या पक्ष्याला टेकू बनवत आणि मोठा होऊ पहात आहे. असाही आरोप महादेव जानकर यांनी केला.

हेही वाचा : नागपूर : ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल सोमवारपासून; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

महादेव जानकर हे पंकजा मुंडे यांना बहीण मानतात. आता त्यांनी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री करण्याची घोषणा त्‍यांनी केली आहे. पंकजा मुंडेंनी भाजप विषयीची नाराजी अनेकवेळा उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे महादेव जानकरांच्या वक्तव्याला आता बळ मिळाले आहे.

Story img Loader