अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा येत्या १७ डिसेंबरला नियोजित आहे. मात्र, याच दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) स्थापत्य अभियांत्रिकी पदाची परीक्षा देखील आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
हेही वाचा : सावधान! विदर्भावर पुन्हा अवकाळीचे संकट, येत्या २४ तासांत पावसाची शक्यता
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेचा निकाल १२ सप्टेंबरला जाहीर करण्यात आला. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या अनेक उमेदवारांनी बांधकाम विभागाच्या अभियांत्रिकी पदाच्या परीक्षेसाठीही अर्ज केले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेची संधी गमवावी लागणार आहे. दोन्ही परीक्षांच्या तारखेत बदल करण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.