अमरावती : राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) अचलपूर येथे एका घरावर छापा घालून एका युवकाची चौकशी केल्‍याची माहिती समोर आली आहे. ‘एनआयए’च्‍या पथकाने सोमवारी पहाटे ही कारवाई केली. यावेळी स्‍थानिक पोलिसांकडून चोख बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता. या कारवाईमुळे अचलपुरात खळबळ उडाली आहे. ‘एनआयए’चे पथक रात्री २ वाजताच्‍या सुमारास अचलपूर येथील अकबरी चौक परिसरात पोहचले. त्‍यांनी एका घरात पोहचून युवकाची चौकशी सुरू केली. या युवकाच्‍या हालचालींवर राष्‍ट्रीय तपास संस्‍था लक्ष ठेवून होती. सकाळी ६ वाजेपर्यंत ही चौकशी चालली. संबंधित युवक नागपूर येथे शिक्षण घेत असल्‍याची माहिती मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ताची १९९८ मध्येच हत्या”, आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा; म्हणाले, ‘‘गृहमंत्र्यांनी आता…’’

हेही वाचा : “उडता महाराष्ट्र! सरकारचे ड्रग्ज माफियांसमोर लोटांगण”, विरोधकांचा आरोप; विधानभवन परिसरात आंदोलन

नागपूर आणि मुंबई येथून तीन वाहनांमधून ‘एनआयए’चे पथक अचलपूर येथे पोहचले. अचलपूर आणि सरमरसपूरा पोलिसांचे संरक्षण घेऊन त्‍यांनी अकबरी चौक परिसरातील एका घरावर छापा घातला. यावेळी पोलिसांच्‍या सुमारे १५ वाहनांचा ताफा पोहचला होता. छापेमारीबाबत मात्र ‘एनआयए’ने अद्याप तपशील दिलेला नाही. स्‍थानिक पोलिसांनीही याबाबत गुप्‍तता पाळली आहे. ‘एनआयए’सारखी राष्‍ट्रीय पातळीवरील तपास यंत्रणा कारवाई करीत असताना स्‍थानिक यंत्रणेला फारशी कल्‍पना देत नसल्‍याचे आजवर दिसून आले आहे. सुरक्षेच्‍या दृष्‍टीने ही बाब महत्‍वाची असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati national investigation agency raid in achalpur youth investigated secret operation by nia mma 73 css