अमरावती : जादूटोणा केल्याच्या संशयावरून पुतण्यानेच काकाचे घर पेटवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खल्लार येथील एका गुन्ह्याच्या तपासात ही धक्कादायक बाब उजेडात आली. या प्रकरणी आरोपी पुतण्यास अटक करण्यात आली आहे. अनिकेत विनायक वानखडे (२३) रा. गौरखेडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पुतण्याचे नाव आहे.

खल्लार येथील रहिवासी पंडित प्रल्हादराव वानखडे (५१) यांचे खल्‍लार फाट्यावर माऊली स्वीट मार्ट नावाचे हॉटेल आहे. ते कुटुंबासह हॉटेलच्या वरच्या मजल्यावर राहतात. २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री त्यांच्यासह कुटुंबातील सदस्य झोपले होते. त्यावेळी त्यांच्या घरात पेट्रोल टाकून जीवे मारण्याच्‍या उद्देशाने आग लावण्यात आली होती. या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचे ५ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले होते.

Munawar Faruqui Death Threat
Munawar Faruqui : बिग बॉस विजेत्या मुनव्वर फारुकीला ठार मारण्याची धमकी, तडकाफडकी ‘या’ ठिकाणी रवाना
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
on Monday man killed on the roof of a building in Kolshet
ठाण्यात शीर धडवेगळे करून एकाची हत्या
Female police officer Angha Dhawale suspended for threatening friend wife Pune news
पुणे: मित्राच्या पत्नीला धमकी देणारी महिला पोलीस निलंबित
person cheated of Rs 6 crore 25 lakh in thane
ठाणे : जादा परताव्याच्या अमीषाने कोट्यवधीची फसवणूक
appoint developers to construct houses in slum Redevelopment Mumbai news
दोन लाख झोपु घरांची जबाबदारी पुन्हा विकासकांवरच?
vasai police station
वसई: सावकारीचा गुन्हा दाखल होण्याची भीती, पती-पत्नीचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न
woman hair salon operator file case against shop owner for threatening in dombivli
डोंबिवलीतील केश कर्तनालयाचा नियमबाह्य ताबा घेणाऱ्या गाळे मालकाविरुध्द गुन्हा

हेही वाचा : भाजपा नेत्या सना खान हत्याकांड : अमित साहूच्या नार्को चाचणीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

तसेच त्यांचा मुलगासुद्धा जखमी झाला होता. या प्रकरणी पंडित वानखडे यांच्या तक्रारीवरून खल्लार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखाही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होती. तपासात सदर गुन्ह्यात पंडित वानखडे यांचा पुतण्या अनिकेत याचा सह‍भाग असल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांवर काकाने जादूटोणा केल्‍यामुळे वडिलांची तब्येत खालावली होती. याचा राग आपल्या मनात होता. या रागातून आपण काकाच्या घरात पेट्रोल टाकून आग लावली. त्यांना जिवाने मारण्याचा प्रयत्न केला, असे त्याने चौकशीत सांगितले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली.

हेही वाचा : रामदास आठवले म्हणतात, वंचितमधील कार्यकर्त्यांसह रिपब्लिकनच्या गटांना सोबत घेणार

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे व खल्लारच्या ठाणेदार चंद्रकला मेसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, सुधीर बावणे, नीलेश डांगोरे, अमोल केंद्रे, विशाल हरणे, परेश श्रीराव, अनुप देशमुख, गोपाल सोळंके, विजय निमखंडे यांनी केली.