अमरावती : भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या प्रचार फलकांवर राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्‍यक्ष संजय खोडके यांचे छायाचित्र लावण्‍यावर खोडके यांनीच आक्षेप घेतल्‍याने अखेर त्‍यांचे छायाचित्र हटविण्‍यात आले आहे. संजय खोडके यांच्‍या आवाहनानंतर आम्‍ही प्रचार फलकांवरून त्‍यांचे छायाचित्र हटविले आहे, मात्र ते आमच्‍यासोबत असतील, असा विश्‍वास असल्‍याचे आमदार रवी राणा यांचे म्‍हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्‍यानंतर महायुतीत अनेक कुरबुरी समोर आल्‍या. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ, प्रहारचे बच्‍चू कडू आणि त्‍या पाठोपाठ राष्‍ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय खोडके यांनी विरोधी भूमिका घेतली. दरम्‍यान, सोमवारी सायंकाळी भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या उपस्थितीत पार पडलेल्‍या संवाद बैठकीच्‍या प्रचार फलकावरून संजय खोडके यांचे छायाचित्र हटविण्‍यात आल्‍याचे दिसून आले.

हेही वाचा : धक्कादायक! राज्यात २४.४० टक्के कुटुंब दारिद्र्यरेषेखाली, नीती आयोगाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह

दोन दिवसांपुर्वी संजय खोडके यांनी थेट नवनीत राणा यांच्‍या नावे निवेदन पाठवून यासंदर्भात खुलासा करण्‍याची मागणी केली होती. निवडणुकीच्या आपल्‍या प्रचाराच्या फलकांवर, पत्रकांवर माझे छायाचित्र वापरले जात असून समाज माध्‍यमांवर सुद्धा प्रसारीत केले जात आहे. समाज माध्‍यमावर किंवा पत्रकांवर माझे छायाचित्र लावण्याची मला काहीही कल्पना नाही. आपण माझे छायाचित्र समाज माध्‍यमांवर किंवा पत्रकांवर वापरण्याबाबत माझी व्यक्तिगत अनुमती सुद्धा घेतलेली नाही. ही बाब निवडणूक आदर्श आंचार संहितेचे उल्लंघन करणारी आहे.

लोकसभा निवडणुकीत माझ्या छायाचित्राचा व नावाचा वापर करू नये, आपण माझ्या छायाचित्राचा वापर ज्या-ज्या माध्‍यमांतून केला आहे तेथून त्वरित काढून प्रसार माध्‍यमामध्ये त्या संदर्भात आपण आपले निवेदन समाज माध्‍यम तसेच व मुद्रित माध्‍यमांमध्ये करावे. जर याबाबत आपण माध्यमांमाधून निवेदन (खुलासा ) केले नाही तर मला कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल, असा इशारा संजय खोडके यांनी दिला होता.

हेही वाचा : काँग्रेसकडून अकोल्यात डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी; तिरंगी लढत होणार

राणा आपल्‍या भेटीसाठी आले होते. त्‍यावेळी आपण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही आणि विरोधातही कुठे बोलणार नाही, असे आपण त्‍यांना स्‍पष्‍ट सांगितले होते. तरीही आता त्‍यांनी प्रचारासाठी आपल्‍या छायाचित्राचा वापर करणे चुकीचे आहे. राष्‍ट्रवादीचे नेते प्रफुल्‍ल पटेल यांच्‍यासोबत देखील या विषयावर आपण स्‍पष्‍टपणे बोललो असल्‍याचे संजय खोडके यांचे म्‍हणणे आहे.