अमरावती : शहरात २०२३-२४ या वर्षात आतापर्यंत एकूण १५ हजार ५७९ श्वानदंशाच्या प्रकरणांची नोंद झाली असून भटक्या कुत्र्यांच्या प्रजनन दराच्या तुलनेत दरवर्षी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जाणाऱ्या कुत्र्यांची संख्या कमी असल्याने अमरावती शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेला अद्यापही यश आलेले नाही. शहरात भटक्या कुत्र्यांची नेमकी संख्या किती याची संख्या महापालिकेकडे नाही. शहरात सुमारे ३० हजारांवर मोकाट कुत्रे असल्याचा अंदाज आहे. गल्लीबोळातच नव्हे, तर मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. शहरातील अनेक भागांत अधूनमधून कुत्र्यांचे हल्ले होण्याचे प्रकार घडत असतात. मोकाट कुत्र्यांकडून घातला जाणारा धुमाकूळ ही चिंतेची बाब झाली असताना पालिकेची यंत्रणा त्यांच्यावर नियंत्रण घालण्यात अपयशी ठरली आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या इतकी मोठी असूनही त्यांना पकडण्याची व्यवस्था अतिशय तोकडी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा