अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्‍या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल सर्वोच्‍च न्‍यायालयात प्रलंबित असताना भाजपसारखी महाशक्‍ती नवनीत राणांना उमेदवारी कशी काय देऊ शकते, भाजपला न्‍यायालयाचा निकाल आधीच ठाऊक झाला आहे का, असा सवाल करीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्‍या उपनेत्‍या सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्‍यावर जोरदार टीका केली.

महाविकास आघाडीच्‍या वतीने काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नेहरू मैदानावर आयोजित जाहीर सभेत त्‍या बोलत होत्‍या. यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, अनिल देशमुख, रमेश बंग, माजी खासदार अनंत गुढे, आमदार धीरज लिंगाडे, उमेदवार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, ज्ञानेश्‍वर धाने, शिवसेनेचे सुधीर सुर्यवंशी, सुनील खराटे, बबलू देशमुख आदी उपस्थित होते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…रामटेकच्या काँग्रेस उमेदवाराचे भवितव्य न्यायालयाचा निकाल ठरवणार; सोमवारी सुनावणी

सुषमा अंधारे म्‍हणाल्‍या, अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्‍या जागेवर बनावट प्रमाणपत्राच्‍या आधारे निवडणूक लढवून नवनीत राणा यांनी मतदारांची फसवणूक केली आहे. अनुसूचित जातीच्‍या अधिकारांवर गदा आणली आहे. काँग्रेसच्‍या उमेदवार रश्‍मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र एकाच दिवसात रद्द केले जाते, पण नवनीत राणांच्‍या प्रकरणात पाच वर्षे हातही लावला जात नाही, ही शोकांतिका आहे.

मध्‍यंतरीच्‍या काळात आपण अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्‍याची चर्चा सुरू होती. जर आपल्‍याकडे बनावट जात प्रमाणपत्र तयार करण्‍याची ताकद असती आणि मोदींची गॅरंटी असती, तर आपल्‍याला ही जागा लढवता आली असती, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

हेही वाचा…वर्ध्यात राष्ट्रवादीच्याच दोघांमध्ये लढत ?

आरत्‍या, श्‍लोक म्‍हणणे ही काही खासदाराची पात्रता असू शकत नाही. त्‍यासाठी गुरूजी नेमता येऊ शकतात. एकीकडे, महाविकास आघाडी ही अतिशय सन्‍मानाने कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी बहाल करते, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना महायुतीकडून प्रतीक्षायादीत ठेवले जाते. ही भाजपची वागणूक आहे. नवनीत राणा यांना आधी उमेदवारी जाहीर केली जाते आणि नंतर मध्‍यरात्री पक्षात प्रवेश दिला जातो. त्‍यांना नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्‍या भेटीसाठी लगेच वेळ दिला जातो. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकवेळा भेटीसाठी ताटकळत असतात. नवनीत राणा यांचे राजकीय वजन वाढले की ही देवेंद्र फडणवीस यांच्‍यासाठी धोक्‍याची घंटा आहे, अशा शब्‍दात त्‍यांनी भाजपवर टीका केली. फडणवीस यांनी पक्ष फोडले, पण त्‍यांना मुख्‍यमंत्री होता आले नाही. ते अस्‍वस्‍थ आहेत. खरे तर महायुतीत आलबेल नाही. खदखद सुरू आहे. प्रसार माध्‍यमे मात्र महावि‍कास आघाडीत धुसफूस सुरू असल्‍याचे सांगतात, ते चुकीचे आहे. महाविकास आघाडीत एकजूट आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

Story img Loader