अमरावती : जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीने झालेले नुकसान, ऑगस्टमध्ये पावसाने खंड दिल्याने पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, कीड-रोगांचा प्रादुर्भाव यामुळे खरीप हंगाम हातून गेला आहे. त्यामुळे आता रब्बी हंगामावर भिस्त आहे. शेतीची मशागत करून काही भागात शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचा हरभरा व गहू पिकाकडे कल असून, हरभरा व गहू लागवड क्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गव्हाच्या क्षेत्रात ७ हजार ७९६ तर हरभऱ्याच्या क्षेत्रात २६ हजार २९० हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज आहे. याशिवाय यंदा रब्बी ज्वारी व मक्याच्या क्षेत्रातही वाढ अपेक्षित आहे.
हेही वाचा : आंतरराष्ट्रीय बुकी सोंटू जैनचे पैसे लपविणाऱ्या मित्राला अटक, बंटी कोठारीला ८ दिवसांची कोठडी
जिल्ह्यात रब्बी हंगामात लागवडीखालील सरासरी क्षेत्र १ लाख ८३ हजार ५४६ हेक्टर इतके आहे. यावर्षी त्यातील २ लाख १८ हजार ५८३ हेक्टरमध्ये पेरणी अपेक्षित आहे. कृषी विभागाने ८० हजार ७८३ क्विंटल बियाण्यांचे नियोजन केले आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने गहू, आहे. हरभरा, मका व ज्वारीची पेरणी केल्या जाते. या सर्व पिकांच्या तुलनेत गहू व हरभऱ्याचे क्षेत्र अधिक राहणार आहे. त्या क्षेत्रासाठी ८० हजार ७८३ क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले असून गव्हासाठी २४ हजार ७८३ तर हरभन्यासाठी ५५ हजार ६२१ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. गव्हासाठी सार्वजनिक क्षेत्रातून ७ जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी हजार २००, खासगी विक्रेत्यांकडून ११ हजार ४८२ व महाबीजकडून ६ हजार १००, तर हरभऱ्यासाठी सार्वजनिक २० हजार ८८०, खासगी १८ हजार १६१ व महाबीजकडून १६ हजार ५८० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली.
यंदा पावसाच्या सरासरीत तूट असली तरी जुलै व सप्टेंबरमधील पावसाने धरणांतील जलसाठा वाढला आहे. याशिवाय विहिरी व भूगर्भातही पाणीसाठा असल्याने जमिनीत ओलावा आहे. त्याचा लाभ रब्बी हंगामास होणार आहे. जुलैतोल अतिवृष्टीने सोयाबीन पिकाची हानी झाल्याने त्या क्षेत्रात रब्बीची पेरणी अपेक्षित असल्याने यंदा या हंगामात पेरणीक्षेत्र वाढले आहे. आता थंडीची चाहूल लागली असून, रब्बी पेरणीयोग्य वातावरण निर्माण झाले आहे. जमिनीत ओलावा असल्याने मोठ्या प्रमाणात तण वाढले असून, त्यामुळे शेतकरी तणनाशक फवारून व ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची मशागत करण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. काही ठिकाणी पेरणीयोग्य झालेल्या क्षेत्रामध्ये हरभरा व गहू पेरणीला सुरवात झाली आहे.