अमरावती : गावात टँकर आल्याची आरोळी ऐकू आली की आदिवासी महिला विहिरीच्या दिशेने धावत सुटतात… टँकरचे पाणी विहिरीत ओतले जाते, तोवर महिलांची स्पर्धा सुरू होते ती पाणी खेचण्याची… हंडाभर पाण्यासाठी विहिरीच्या काठावर उभे राहून या महिला जीवाचा आटापिटा करून पाणी मिळवतात. मेळघाटातील खडीमल या गावातील ही स्थिती आहे… शहरवासीयांच्या कल्पनेपलीकडची…

पहाटेपासून खडीमल गावातल्या महिला टँकरची वाट बघत बसतात. टँकर आला की गावकऱ्यांची धावाधाव सुरू होते. टँकरवरच्या पाण्यावरून धक्काबुक्की होते म्हणून टँकर विहिरीत रिकामा केला जातो. हे पाणी काढण्यासाठी शेकडो हंडे, डबे विहिरीचे तळ गाठतात. तासभर जीवाची बाजी लावून गावकरी पाणी उपसत राहतात.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Maha Vikas Aghadi And Mahayuti Battle For Votes
अग्रलेख : गॅरंट्यांचा शाम्पू!
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

हेही वाचा…कार वॉशिंग व्यवसायिकांना यंदा संघाचे बौद्धिक, संघाची कार्यपध्दती समजावून सांगणार

मेळघाटातील बेला, मोथा, धरमडोह, आकी, बहाद्दरपूर आणि गौलखेडा बाजार या गावांमध्येदेखील खडीमल गावासारखीच परिस्थिती आहे. अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. गावातील विहिरी कोरड्या पडत असल्याने टँकरद्वारे या विहिरीत पाणी आणून सोडले जाते. मात्र, विहिरीतील पाणी संपताच पुन्हा गावकऱ्यांना टँकरची प्रतीक्षा करावी लागते. प्रशासनाला पाणी पुरवण्याचा सुसह्य मार्ग अजूनही सापडलेला नाही.

पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करू, असे आश्वासन देऊन अख्खे वर्ष लोटले, तरीही खडीमलची पाणी समस्या कायम आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्या गावातील तीन तलावांमधील गाळ उपसावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

धारणी आणि चिखलदरा मिळून मेळघाटात सुमारे ३२५ गावे आहेत. यापैकी तालुक्याचे ठिकाण असलेली दोन शहरे सोडली तर इतर सर्व लहान-मोठ्या गावांमध्ये सध्या पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. नागरिक दोन-तीन किलोमीटरचे अंतर कापून दूरवरून पाणी आणतात. प्रशासन दरवर्षी मोजक्या गावांमध्ये तात्पुरत्या उपाययोजना हाती घेते. पण, कायमस्वरूपी उपाययोजना का करण्यात येत नाही, असा प्रश्न गावकरी उपस्थित करतात.

हेही वाचा…लोकजागर : निवडणूक आख्यान – चार

२८ वर्षांपासून टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा

खडीमल या गावात गेल्या २८ वर्षांपासून टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मूळ कंत्राटदार हा सातारा जिल्ह्यातील आहे. त्याच्यामार्फत स्थानिक पातळीवर कुणाला तरी हाताशी धरून टँकरची व्यवस्था केली जाते. त्यांची देयके अडवून ठेवण्यात येत असल्याने अपुरा पाणीपुरवठा केला जातो, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. ज्यांनी २०२२ मध्ये टँकरने पाणीपुरवठा केला होता, त्यांना अजूनही मोबदला मिळालेला नाही.

हेही वाचा…नागपूर विद्यापीठात वाद : परीक्षेत ‘आरएसएस’ संस्थापक डॉ. हेडगेवारांवर प्रश्न, विद्यार्थी म्हणतात, ‘जाणीवपूर्वक…’

खडीमल गावानजीकच्या तीन तलावांमधील गाळ काढणे आवश्यक आहे. खडीमल या गावात ४ टँकरद्वारे ३ फेऱ्या अपेक्षित आहेत. मात्र, १२ टँकरमधून ५५ हजार लिटर पाणी कधीच मिळाले नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेव्हा खडीमल गावात पाहणीसाठी आले, तेव्हा पुरेसे पाणी गावकऱ्यांना मिळाले होते, पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे.- ॲड बंड्या साने, सदस्य, गाभा समिती.