अमरावती : दैनंदिन आर्थिक व्यवहारांपासून ऑनलाइन शिक्षण, नोकरी शोध आदींकरिता स्मार्टफोन, इंटरनेट, संगणकाचा वापर वाढू लागल्याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार सातत्याने घेऊ लागले आहेत. नोकरीचा शोध घेणाऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार त्यामुळेच वाढू लागले आहेत. अर्धकालीन नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाइन कामे सांगून गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. अशाच प्रकारच्‍या दोन घटनांमध्‍ये एका महिलेसह दोघांची २.६४ लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : नागपुरात रुग्ण भर पावसात उघड्यावर! मेडिकल रुग्णालय परिसरात चालले काय?

तिवसा ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २६ वर्षीय महिलेला व्हॉट्स अॅपवर संदेश आला. त्यामुळे महिलेने आपण कोण, त्यावर आपण बिमला बोलत असल्याचे सांगून महिलेला मॅसेजद्वारे पार्ट टाइम जॉबबाबत माहिती देऊन आपण इच्छुक आहात का, अशी विचारणासुद्धा करण्यात आली. महिलेने होकार दिल्यावर टास्क पूर्ण करावे लागेल, असे सांगून त्यांची अडीच लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने तिवसा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून संबंधित मोबाइल क्रमांकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत घडलेल्‍या दुसऱ्या एका घटनेत टास्‍क पूर्ण करण्‍याच्‍या नावाखाली एका व्‍यक्‍तीला सुरूवातीला काही रक्‍कम पाठविण्‍यात आली. पण नंतर १४ हजार ३०० रुपयांची फसवणूक करण्‍यात आली.