भंडारा : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून परत येत असताना रात्रीच्या सुमारास झालेल्या कार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने भंडारा कोरंभी मार्गावर हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली. या अपघातात प्रणय सुखदेवे, वय २२ रा. कोरंभि आणि राजेश शिंगाडे वय २३ रा. नवेगाव या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अमर बोरकर, हर्षल उर्फ बंटी सुखदेवे, अक्षय कांबळे हे गंभीररित्या जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनूसार , काल बंटी सुखदेवे याचा वाढदिवस होता. वाढदिवसाची पार्टी करून हे सर्व मित्र गावाकडे परत येत होते. यावेळी भंडारा कोरंबी मार्गावर चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून लगतच्या झाडाला कार आदळली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : “विदर्भात ९० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे काय झाले?” प्रदीप माहेश्वरी यांचा सवाल

या घटनेत मृत पावलेले दोन्ही युवक एकुलते होते. प्रणयच्या आईवडिलांचे बऱ्याच वर्षापूर्वी निधन झाले असून त्यांचा सांभाळ आजीने केला. सध्या आजी आजारी असून तोच आजीचा काळजी घेत होता. तर राजेश सिंगाडे हा नागपूर येथे अभियांत्रीकीचे शिक्षण घेत होता. तेथूनच तो वाढदिवसानिमित्त परस्पर येथे आला होता. प्रणयच्या मोठ्या वडिलांचा मुलगा हर्षल उफ बंटी हा आयुधनिर्माणी जवाहरनगर येथे राहतो. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी हे सर्व नातलग असलेले युवक कोरंभी येथे हॉटेल हिलसाईड येथे आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर भंडाऱ्याला चहा पिण्याच्या निमित्ताने येत असताना पहाडीजवळच्या वळणावर त्यांची कार बाभळीच्या झााडाचा धडकली.पाेलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader