भंडारा : गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असून पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी अखेर गोसेखुर्द धरणाचे ३३ ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. या मोसमात पहिल्यांदा धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. ३० दरवाजे हे अर्ध्या मीटरने तर ३ दारे १ मीटरने उघडण्यात आले आहेत. यामधून सध्या ३९७८.७५ क्युमेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मागील २४ तासात संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने तसेच गोसीखुर्द पानलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरु असल्यामुळे धरणात पाण्याची आवक सतत होत होती त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित आणण्यासाठी गोसीखुर्द धरणाच्या प्रशासनाने संपूर्ण ३३ दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. दर तासाला धरणात येणाऱ्या पावसाचा प्रवाह लक्षात घेऊन दार उघडण्याचे प्रमाण कमी जास्त केले जात आहे. धरणाचे दरवाजे टप्याटप्याने उघडण्यात येणार होते मात्र मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात वाढणाऱ्या पाण्यामुळे सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास संपूर्ण ३३ ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्राजवळील गावांतील सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. संजय सरोवर, पुजारी टोला, बावनथडीचे दरवाजे अद्याप उघडण्यात आलेले नसून धापेवाडा धरणाचे ५ दरवाजे ०.७० मी ने उघडण्यात आले असून ३६३.१५ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
cop 29 climate change conference in baku capital of azerbaijan
विश्लेषण : ‘कॉप २९’ची एवढी चर्चा का?

हेही वाचा : नागपूरच्या विमानसेवेला फटका, इंडिगोचे मुंबई-नागपूर विमान रद्द, दिल्लीच्या विमानांना विलंब

२३ मंडळात अतिवृष्टी…

जिल्ह्यातील १ जून ते २० जुलै दरम्यान १०६.४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली असून २३ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. यात भंडारा, शहापूर, धारगाव,पहेला,खोकरला,खमारी,पवनी,अड्याळ,पवनी, चिचाळ, आसगांव, आमगाव, सावरला, मोहाडी,पालोरा, साकोली, सानगडी ,लाखनी,पालांदूर, मुरमाडी ,लाखांदूर,विरली, बारव्हा, मासळ, भागडी यांचा समावेश आहे.

एका आठवड्यात पाऊस परतला

जून आणि जुलै महिन्यात सुरुवातीपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरीही चिंतित झाले होते. कारण पावसामुळे जवळपास ७० टक्के रोवण्या या रखडलेल्या होत्या. मात्र मागील आठवड्यापासून पावसाने भंडारा जिल्ह्यात हजेरी लावली. जिल्ह्यात सातही तालुक्यांमध्ये पाऊस बरसला. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाच्या तुलनेत भंडारा जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात बरसला. मात्र गोसे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी आणि गुरुवारी चांगल्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तसेच नागपूर जिल्ह्यात पावसाच्या दमदार हजेरीने धरणातील पाणी पातळी वाढली आहे.

हेही वाचा : Nagpur Rain News: नागपुरात मुसळधार पाऊस, वकिलांनी न्यायालयाला काय विनंती केली?

प्रशासन सज्ज

भंडारा जिल्ह्यात ऑगस्ट २०२२ मध्ये महापूर आला होता. हा महापूर मध्यप्रदेशमधील धरणाचे पाणी अचानक सोडल्याने गोसे धरणातील पाणी त्या प्रमाणात सोडता येत नव्हते. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर गोसे धरणातील पाणी सोडल्याने गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर आला होता. २०२० आणि २२ मध्ये झालेल्या या गोंधळानंतर यावर्षी भंडारा जिल्ह्यातील प्रशासन सज्ज असून ही परिस्थिती टाळण्यासाठी गोसे धरणाची पाणी पातळी कायम ठेवण्यासाठी धरणाचे दारे टप्या टप्प्याने उघडण्यात आली आहेत.