भंडारा : सध्या जिल्ह्याचे तापमान चांगलेच वाढले आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट असून तापमानाचा पारा प्रचंड वर पोहोचला आहे. लोकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. उन्हाचा त्रास होऊन आजारी पडणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. अशातच उष्माघातामुळे लाखांदूर येथील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाचजणांवर उपचार सुरू आहेत.

भास्कर तरारे (रा. लाखांदूर) यांचा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज ३० मे रोजी मृत्यू झाला. रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अतुल टेंभुर्णे यांनी तरारे यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे सांगितले. नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करावा. शक्यतो उन्हात बाहेर पडणे टाळावे आणि शरीरातील तापमान नियंत्रित राहील या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन डॉ. टेंभुर्णे यांनी केले आहे.

Bihar hooch Tragedy
Bihar Hooch Tragedy : दारूबंदी असलेल्या राज्यात विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव, घराघरांत मृतदेह, अनेकांनी दृष्टी गमावली; बिहारमध्ये नेमकं काय घडलं?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
loksatta Lokshivar fake onion seeds in the market has increased for sale
लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
buldhana person drowned
बुलढाणा: चौथ्या दिवशी सापडला एकाचा मृतदेह; दोघे बापलेक मात्र बेपत्ताच
chandrapur lloyds metals project
चंद्रपूर: घुग्घुसवासियांचा श्वास प्रदूषणामुळे गुदमरणार
ex corporator demand compensation for jogeshwari residents for suffer heavy loss due to rain
अतिवृष्टीबाधित जोगेश्वरीवासियांना नुकसान भरपाई द्या- जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Wardha dead bodies reservoir, Wardha,
वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात

हेही वाचा : “यवतमाळ-वाशीम लोकसभेच्या मतमोजणीला स्थगिती द्या”, उच्च न्यायालयात याचिका; आक्षेप काय? जाणून घ्या…

आज भंडाऱ्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असा सल्ला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दिला आहे. उन्हाचा त्रास होऊन लोक आजारी पडून लागले आहेत. जिल्ह्यात उष्माघातामुळे पहिल्या मृत्युची नोंद झाली असून आणि पाच रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयाला उपचार सुरू आहेत.