भंडारा: नदीवर आंघोळ करण्याकरिता गेलेला एक इसम तोल गेल्याने नदीपात्रात बुडाला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील चुलबंद नदीकाठवर शुक्रवारी दुपारी घडली. गजानन शेंडे (५२, रा. भागडी) असे या इसमाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राप्त माहितीनुसार, अती मद्यप्राशन केलेले शेंडे गावातील तान्हा पोळ्याचा कार्यक्रम आटोपून चुलबंद नदीवर आंघोळ करण्याकरिता गेले होते. तोल गेल्याने ते चुलबंद नदीपात्रात बुडाले. नदी काठावर उपस्थित नागरिकांनी घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली.

हेही वाचा… मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या, प्रवासी वाढतील? सोमवारपासून नागपुरात दहामिनिटांनी…

पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र, नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचा शोध लागला नाही. आज, शनिवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhandara a man who went to bathe in the river lost his balance and drowned in the river ksn 82 dvr
Show comments