भंडारा : चारित्र्याच्या संशयावरून मोठ्या भावाचा बहिणीसोबत शाब्दिक वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीपर्यंत पोहचले, अशातच भावाने बहिणीचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू झाला. सदर घटना भंडारा तालुक्यातील वरठी लगतच्या सोनूली येथे घडली. वरठी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून आशिष गोपीचंद बावनकुळे (२२) याला अटक केली आहे. अश्विनी बावनकुळे (२०) असे मृत बहिणीचे नाव आहे. भंडारा तालुक्यातील वरठी नजीकच्या सोनूली या गावात रविवारी घडलेली ही घटना रात्री उशिरा उघडकीस आली.

सोनूली येथे गोपीचंद बावनकुळे आपल्या परिवारासह अनेक वर्षांपासून राहतात. ते एक मुलगा व मुलगी आणि पत्नी सोबत राहत असून आई वडील मोलमजुरी करतात. घटनेच्या दिवशी आई साकोली व वडील कन्हानला कार्यक्रमानिमित्त गेले होते. दरम्यान आशिष व त्याची बहीण अश्विनी दोघे घरी होते. दुपारी दोघात प्रेमप्रकरणावरून शाब्दिक वाद झाला. क्षुल्लक वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. वाद एवढा विकोपाला गेला की आशिषने अश्विनीच्या नाका-तोंडावर बुक्क्या हाणल्या. एवढ्यावरच न थांबता तिचा गळा आवळला. यात नकळत ती गतप्राण झाली. घटनेनंतर कुठेही वाच्यता न करता तो गावातच थांबून राहिला. आपल्या हातून घडलेले कृत्य लपविण्यासाठी त्याने लहान बहीण छतावरून पडल्याचे आईवडिलांना सांगितले. सायंकाळपर्यंत गावातही शुकशुकाट होता.

ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
graphic representing the issue
Honor Killing : बापाने पोलिसांसमोरच पोटच्या मुलीवर झाडल्या गोळ्या, चार दिवसांवर आलं होतं लग्न; नेमकं काय घडलं?
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना

हेही वाचा : ‘जग्गू डॉन’ने शेतकऱ्यांना फसवून खरेदी केली कोट्यवधीची मालमत्ता; फ्लॅट, दुकान, शेतीची खरेदी अन्…

दरम्यान, पोलीस पाटीलांनी घटनेबाबत पोलिसांना सायंकाळी सूचना केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात हलवला. तो पर्यंत पोलिस यंत्रणा घटनेचा शोध घेण्यास कामाला लागली. गळ्यावर दाबल्यागत खुणा दिसत असल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली व आशिषला विचारपूस केली. यावेळी तो पोलिसांसोबत दवाखान्यात होता. शवविच्छेदन अहवालात सर्व उघड होण्याची कल्पना येताच त्याने रात्री दवाखान्यातच खुनाची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून आशिषला ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अभिजित पाटील व उपनिरीक्षक महेंद्र शहारे, हवालदार विनायक बेदरकर करीत आहेत.

हेही वाचा : अकोला : १५ वर्षीय मुलीने धावत्या रेल्वेतून मारली उडी अन् सर्वांच्याच काळजाचा ठोका चूकला

परिक्षेकरिता आली होती स्वगावी

अश्विनी नागपूरला मावशीकडे राहायची. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती नागपूरला व्यावसायिक शिक्षण घेत होती. १२ वी नंतर तिने भंडारा येथील महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश घेतला होता. सध्या हिवाळी परीक्षा सुरू असल्याने ती परीक्षा देण्यासाठी २२ तारखेला सोनूली येथे आली होती.

Story img Loader