भंडारा : जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कारधा येथे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडून दीड मीटरवरुन नदीचे पाणी वाहत आहे.

पोकलेन गेले वाहून

भंडारा जवळील आंभोरा येथे बायपास पुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी पोकलेन मशीनसह अन्य साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे. वैनगंगेला पूर आल्याने या पुराच्या प्रवाहात सकाळी पोकलेन मशीन वाहून गेले. गोसेखुर्दच्या पात्राकडे हा प्रवाह जात असून अंभोरा येथील नवनिर्मित पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलावर सुरू असलेल्या बांधकामादरम्यान आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पोकलेन मशीन वाहून गेले. विजेच्या हायटेन्शन लाईनच्या तारा या मशीनमुळे तुटत असल्याने परिसरातील गावांनाही धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीने हायटेन्शन लाईनचा वीजप्रवाह बंद केला आहे.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Chandrapur city Rain of Rs 200 notes morning aam aadmi party BJP election campaign
आश्चर्य! चंद्रपूर शहरात पहाटे चक्क २०० रूपयांच्या नोटांचा पाऊस…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
The minimum temperature in Mumbai is decreasing and the winter season is beginning Mumbai print news
मुंबईत थंडीची चाहुल
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!

हेही वाचा : वर्धा : तो अनाथ, ती दिव्यांग ! प्रेमाच्या आणाभाका आणि कुटुंबाचा विरोध झुगारून शुभमंगल.

पूर येण्यामागील नेमके कारण काय?

मध्य प्रदेशातील संजय सरोवरची ४, पुजरीटोला ८ आणि गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा धरणाची सर्व दारे उघडण्यात आली असून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. २०२० आणि २०२२ मध्ये आलेल्या महापुरासारखी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. भंडाऱ्याला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल वैनगंगा नदीच्या पाण्याखाली गेला आहे. पुलावरुन दीड फुटावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे छोट्या वाहनांची रहदारी या बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : संकेत बावनकुळे कारमध्ये असल्याचे उघड ; नागपूर ‘हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांची माहिती

‘हे’ रस्ते बंद…

भंडारा ते कारधा लहान पूल, करचखेडा ते खमारी, मांढळ ते सुकळी, तुमसर ते पिपरा, येरली ते तुमसर, तुमसर ते बालाघाट (बपेरा पुल), तामसवाडी ते सीतेपार, तुमसर ते उमरवडा, कर्कापूर ते रेंगेपार, बोरगांव ते पालोरा, आंधळगाव ते पेठ, बोरगाव ते महालगाव, कान्हाळगाव ते डोंगरगाव, वडेगाव ते अकोला, जाम्ब ते लोहारा, मांढळ ते सुकळी, साकोली ते खैरलांजी, सोनपुरी ते बोदरा, आमगाव ते बांपेवाडा, किन्ही ते लाखनी, विहीरगांव ते भुगांव, परसोडी ते चारगाव, गिरोला ते खंडाळा, विहीरगाव ते सानगडी, खैरी ते पिंपळगांव, साकोली ते जांभळी खांबा, साकोली ते सातलवाडा विर्सी, शेंदूरवाफा ते उमरी, मिरेगाव ते सामलवाडा, वांगी ते खोबा, वाकल ते तई, मऱ्हेगांव ते बारव्हा, तई ते परसोडी, पोहरा ते मेंढा, पालांदूर ते निमगाव, पालांदूर ते मऱ्हेगांव, पालांदूर ते दिघोरी, तई ते बारव्हा, तई ते पाऊलदवना, बोथली ते बारव्ह, पिंपळगाव ते दहेगांव, मांढळ ते दांडेगाव, मांढळ ते किन्ही, धर्मापुरी ते बोथली, मांढळ ते ओपारा, मांढळ ते भागडी, इटान ते कऱ्हाडला, भागडी ते चिचोली दांडेगाव ते मांढळ, दिघोरी ते पालांदूर, हे मार्ग सध्या बंद आहेत.