भंडारा : लाखनी तालुक्यातील मानेगाव येथे तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ही घटना ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर मानेगाव गावात व परिसरात शोककळा पसरली आहे. बिरजू (२०) आणि कृष्ण सिंह चित्तोडिया (२०) अशी मृतांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – सावरकर गौरव यात्रेत नितीन गडकरी यांनी चक्क राहुल गांधींचे मानले आभार, म्हणाले, “तुमच्यामुळे..”

हेही वाचा – “पंतप्रधान आणि अदानी यांचे नाते काय?”, डॉ. नितीन राऊत आक्रमक, म्हणाले “ते २० हजार कोटी रुपये कुठून आले?”

लाखनीपासून दोन किलोमीटर अंतरावर मानेगाव हे गाव असून सुमारे महिनाभरापूर्वी भटक्या समाजाचे चित्तोडिया कुटुंब या गावात वास्तव्यास आले. मानेगाव रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबातील लोकांनी परिसरात आयुर्वेदिक औषधे विकून उदरनिर्वाह सुरू केला. बिरजू आणि कृष्णसिंग हे दोघे ४ एप्रिल रोजी सायंकाळी मानेगावजवळील तलावात आंघोळीसाठी गेले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. माहिती मिळताच तलावाजवळ नागरिकांनी गर्दी केली. पोलीस पुढील तपास करत आहे.