भंडारा : मोक्का प्रकरणातील सराईत आरोपी नईम शेखची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ काल २५ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या खुनाचा मुख्य आरोपी संतोष दहाट हा फरार असून दोन वर्षांपूर्वी नईमने त्याच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नईम शेख खानचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तडीपार असलेला कुख्यात गुंड संतोष दहाटने आपल्या नागपूर येथील सात आरोपी मित्रांसोबत मिळून हे हत्याकांड घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. काही कामानिमित्त बालाघाट तिरोडीहून मृतक नईम शेख, साथीदार कालू माटे, जावेद पठाण आणि शहीद पठाण सोबत चार चाकी वाहनाने तुमसर कडे येत होते. संतोष दहाट आपल्या सात साथीदारांसोबत त्यांचा पाठलाग करत होता. गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ येताच ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या नईम खान वर त्याने सुरुवातीला गोळ्या झाडल्या. पहिली गोळी कारच्या दाराला लागली.

हेही वाचा : कार पार्कींगचा वाद; पोलीस कर्मचाऱ्याच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

दरम्यान गाडी थांबवून नईम शेखवर धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्याच्या वेळी नईमचे तिन्ही साथीदार पळून गेले. नईम मृत झाल्याचे समजताच संतोष दहाट व त्याचे साथीदार घटना स्थळावरून पळून गेले. पुढे मृतक नईमच्या साथीदारांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे नईम खान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी चार आरोपींना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व आरोपी नागपूरचे आहेत. त्यांनी संतोष दहाटने प्रकरण घडवून आणल्याचे कबूल केले आहे.

हेही वाचा : राज्यात हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ

दोन वर्षांपूर्वी मृतक नईम शेखने तडीपार गुंड संतोष दहाटवर गोळीबार केला होता. त्यात संतोष दहाट वाचला. तेव्हापासून तो नईम शेखच्या मागावर होता. आज संधी मिळताच त्याने नईम शेखचा ‘गेम’ केला. भंडारा पोलिस मुख्य आरोपी संतोष दहाटचा शोध घेत आहेत. बॅटरी व्यावसायिक आणि नंतर वाळू तस्करीचा म्होरक्या झालेला मोक्काच्या आरोपीचा झालेला असा झालेला अंत चर्चेचा विषय ठरला आहे.