भंडारा : जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला मॉइल्स मॅग्नीज खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. तिसऱ्या पातळीचे छत कोसळून दोन मजुराचा ढीगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला तर एक जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९ ते १० वाजता दरम्यान घडली. आणखी काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली चिखला येथील मॅग्नीज खाणीत मॅग्नीज काढण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये आणखी काही कामगार दबून असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंडरग्राउंडमध्ये १०० मीटरच्या घडली घटना घडली. चिखला येथे गदेघाट मधील तिसरी लेवल कोसळल्याने दुर्घटना घडली आहे. चिखला मॉइल्सची २४२५ नंबरच्या फेसमध्ये घडली ही दुर्घटना घडली आहे. मॅग्नीज ब्लास्टिंगनंतर त्यातील मॅग्नीज काढण्यासाठी सकाळी सहा ते सात कामगार अंडरग्राउंड माईन्समध्ये कामासाठी गेले होते. यावेळी अंडरग्राउंडमध्ये १०० मीटरच्या आत ही दुर्घटना घडली आहे.

यात एक कामगारांचा मृत्यूदेह बाहेर काढले असून एकाचा रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आणखी काही कामगार ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त होत आहे.

Story img Loader