भंडारा : गद्दार आमदाराला धडा शिकवा आणि पुन्हा एकदा २०१९ ला जो इतिहास घडवला तो इतिहास घडवा, असे आवाहन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. भंडारा येथील शिवस्वराज्य यात्रेतून जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल करत अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
ते म्हणाले की, नव्याने इतिहास घडवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. म्हणून आज आम्ही सगळे आपल्या दारात आलेले आहोत. राज्यात विकासकामे होत नाही म्हणून लोकं त्रस्त झाले आहे. पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सरकार घाबरले आणि घाबरलेल्या सरकारने आपल्या तिजोरीचे दार काढून बाजूला ठेवले. जाहिराती करून सरकारला समाधान नाही. त्यामुळं सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी घराघरात जाहिरात केली जात आहे. सगळ्यांनी एकमताने काम केलं पाहिजे. चार पाच जण मिळून सरकार चालवत आहेत. तरी त्यांना यश येत नसल्याची टीकाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
हे ही वाचा…“आमदार पुत्र आहे म्हणून झुकते माप नको, निष्पक्ष चौकशी व्हावी”, काय म्हणाले काँग्रेस आमदार…
राज्यात लाडक्या बहिणी सुरक्षित नाही
आगामी विधानसभेसाठी उमेदवाराची निवड करणे अवघड आहे. म्हणून आपण सगळ्यांनी किती क्षमतेने माणसं गोळा केलेली आहे, हे बघण्यासाठी ऐन गणपतीचा महोत्सव चालू असताना देखील शिवस्वराज्य यात्रा काढून आम्ही सगळे आपल्या दारात घेऊन बघण्याचा प्रयत्न करतोय. आनंददायी बाब म्हणजे जेवढे पुरुष आहेत बहुतेक तेवढ्याच महिला तुम्ही गोळा केलेल्या आहेत. महाराष्ट्रातलं युतीचं सरकार घालवण्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. लहान मुलं मुली शाळेत जातात त्यांच्यावर अत्याचार कोणी करणार नाही, याची खात्री आम्ही महाराष्ट्राला देऊ. त्यामुळे आज लाडक्या बहिणीच सुरक्षित नाही. ही समाजात पसरलेली भावना कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही जयंत पाटील म्हणाले.
हे ही वाचा…संकेतच्या कारची मानकापूर चौकातही पोलो कारला धडक, तिघांनाही मारहाण ..
राज्य सुजलाम सुफलाम होणार…
आपण ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जातो, जिल्हा रुग्णालयात जातो ती उत्तम सेवा तिथे तुम्हाला मिळाली पाहिजेत. तुमच्या सगळ्या शेतीच्या पाण्याचे प्रश्न असतील, आता धापेवाडा सिंचन योजना प्रलंबित आहे. मी या खात्याचा मंत्री असताना बऱ्याच बैठका झाल्या प्रकल्पाला गती देण्याचं काम केलं, वन विभागाचे काही प्रश्न होते पण या सगळ्या योजना पूर्ण झाल्यानंतर शेतकरी सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.
हे ही वाचा…नागपूर ‘हिट अँड रन’ : रात्री १२.३० ते १ या वेळेत संकेत बावनकुळेचे लोकेशन काय होते? काँग्रेसचा सवाल
‘ते’ घटना बदलणार होते
हेलिकॉप्टर खरेदी करणाऱ्याला सुट आणि गाडी, मोटरसायकल, सायकल खरेदी केलं तर त्याच्या २८ टक्के , १८ टक्के किंवा २४ टक्के कर सरकार लावत आहे. महाराष्ट्राची महागाई कमी झाली पाहिजे. तुमच्या शेतीमालाला चांगला दर मिळाला पाहिजे. कपाशीला चांगला दर मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणारे महाराष्ट्रातलं सरकार असलं पाहिजे, अतिवृष्टी होते सरकार इकडे बघत नाही आणि मग सरकारच्या सभा होतात सामान्य माणसे यांच्या सरकारच्या सभांना जायला बंद झालेली आहेत. लोकसभेला तुम्ही काय केले, भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी मतदान केले. कारण काय तर हे सरकार भारतीय जनता पक्ष हा पक्ष या देशांमध्ये घटनेतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या तरतुदी बदलण्याचा, घटना बदलण्याचं काम करणार होते. पण काहीही करून भाजपचं सरकार आलं नाही. दुसऱ्या दोन पक्षांना मदत घेऊन यांनी केंद्रात सरकार स्थापन केले. उमेदवार हा महाविकास आघाडीच्या संमतीने तुतारी वाजवणारा माणूस उभा राहिला तर ते चिन्ह घराघरापर्यंत पोचवण्याचं काम देखील तुम्ही केलं पाहिजे. असे आवाहनही जयंत पाटील यांनी बोलतांना केले आहे.