भंडारा : ज्या शाळेने माझ्या भविष्याची पायाभरणी केली, अशी माझी प्रिय शाळा दत्तक योजनेतून मला कुठल्याही परिस्थितीत चालवायला द्या. माझ्याकडे पैसे नाहीत, हवी तर माझी किडनी विका आणि शाळा माझ्याकडे सोपवा, अशी उद्विग्न मागणी भंडारा तालुक्यातील माडगी येथील जागेश्वर पाल या उच्चशिक्षित सरपंचाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे. सध्या त्यांनी लिहिलेले हे आगळेवेगळे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याच पत्राची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

शासनाच्या शाळा दत्तक योजनेबद्दल सर्वस्तरातून नाराजीचा सूर उमटत आहे. या निर्णयावरून राज्यभरात सरकारविरूद्ध टिकेची झोड उठली असून पालक, शिक्षक संघटनांनी नाराजीचा सूर व्यक्त करीत मोर्चे काढून, आंदोलने करून आपल्या संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. सरकार मोठमोठ्या देणग्या घेवून त्यांची नावे शाळेला देणार आहे. इमारत दुरुस्ती, देखभाल, रंगरंगोटीसह, उपक्रम राबवायचे आहेत. सरकारी शाळा खासगी संस्थांच्या हातात सोपविण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे.

Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
upsc exam preparation guidance in marathi
UPSC ची तयारी : नैतिक विचारसरणीच्या विविध चौकटी (भाग-१)
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!

हेही वाचा : शाळेत सोडतो, असे सांगून चिमुरडीला शेतात नेले अन् केलं भयंकर कृत्य; उमरखेड येथील घटनेने संताप

स्थानिक स्वराज्य संस्था प्रस्ताव मागवून शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेणार आहे. शाळा दत्तक घेतल्यानंतर देणगीदाराने त्याचे पालकत्व स्वीकारायचे आहे. गरजेनुसार वस्तू पुरविण्याची त्याची जबाबदारी असणार आहे. त्याने इच्छा व्यक्त केल्यास त्याचे नाव शाळेला देण्यात येणार आहे. सरकार गोरगरीबांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात लोटत असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे. असाच एक आगळावेगळा निर्णय सध्या चर्चेचा ठरला आहे.

नाव नको पण शाळा हवी

जागेश्वर पाल यांचे शिक्षण डी.एड व बी.एड. पर्यंत झाले आहे. परंतु, नोकरी नसल्याने ते घरची शेती सांभाळतात. ते उपसरपंच असून त्यांच्याकडे सध्या माडगी ग्रापंच्या सरपंचपदाची जबाबदारी आहे. त्यांना शेतीसह समाजकारण आणि शिक्षणातही रस् आहे. त्यांच्या मते सरकार देणग्या घेवून शाळा खासगी संस्थांना दिल्यामुळे जिल्हा परिषद आणि मराठी माध्यमांच्या शाळांचे नुकसान होणार आहे. आपल्या गावची शाळा इतर कोणाच्या हातात देण्यापेक्षा ती मला माजी विद्यार्थी म्हणून चालवायला द्यावी. माझ्याकडे पैसे नाहीत. त्यासाठी माझी किडनी विकायला तयार आहे, असे पाल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : यूजीसीचे प्रथमच निर्देश! रँगिंग व अन्य बाबींचे अहवाल सादर करा

“मराठी आणि जिल्हा परिषदेच्या शाळा वाचाव्यात हीच माझी भूमिका आहे. माडगी गावातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा ही शाळा दत्तक योजने अंतर्गत चालविण्यासाठी मला देण्यात यावी यासाठी जिल्हाधिकऱ्यांना पत्र लिहिले. त्याकरिता लागणारी रोख रक्कम माझ्याकडे नसल्याने मी महाराष्ट्र शासनास माझी एक किडनी देण्यास तयार आहे. एवढ्यावर भागत नसल्यास दुसरी किडनीही देण्यास तयार आहे. हा निर्णय मी स्वच्छेने शांत विचाराने आणि पूर्ण शुद्धीत घेतला आहे. महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या मुलांच्या भविष्याचा शैक्षणिक विचार करून व मराठी प्राथमिक शाळांच्या प्रेमापोटी हा निर्णय घेतला आहे”, असे माडगीचे प्रभारी सरपंच जागेश्वर पाल यांनी म्हटले आहे.