भंडारा : एरव्ही वाघ दिसला की लोकांना घाम फुटतो आणि अक्षरशः थरकाप उडतो. मात्र सध्या एक नवा ट्रेंड सुरू झालाय. जंगलव्याप्त गावात किंवा परिसरात कुठेही वाघ दिसला की त्या वाघाच्या अगदी जवळ जाऊन लोक त्याच्यासोबत फोटो सेशन करू लागले आहेत. शांत बसलेल्या वाघाला दगड मारणे, त्याच्या जवळ जाऊन मोठमोठ्याने ओरडुन, अगदी जवळून फोटो, व्हिडिओ काढणे, त्याला डीचवणे असे अनेक प्रकार समोर येत आहेत. मात्र या हिंस्त्र प्राण्याचा मूड कधी बदलेल आणि तो कधी हल्ला करेल, याचा नेम नाही. अशा अनेक घटना समोरही आलेल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत खबरदारी घेण्याऐवजी लोक जीव धोक्यात घालत आहेत. असाच एक प्रकार अड्याळ वन परिक्षेत्रात घडला असून वाघासोबत फोटो सेशन करण्यासाठी लोकांनी चक्क त्याला घेरले. विशेष म्हणजे या परिसरात सलग दुसऱ्यांदा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या लोकांवर वन विभागाकडून कारवाई होणार का, असे प्रकार घडू नये यासाठी वन विभाग काय पावले उचलणार असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

मागील काही दिवसांपासून पवनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्राअंतर्गत मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना समोर आल्या आहेत. मांगली धरणाजवळ तलावाच्या काठावर वाघ दिसल्याच्या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली. हा तलाव गावापासून दूर, जंगल आणि डोंगरांनी वेढलेला आहे. घटनेनुसार, रविवारी वाघाने जंगलाजवळील तलावात सांबराची शिकार केली होती, त्यानंतर तो विश्रांती घेत होता. यावेळी काही गावकऱ्यांना वाघ तिथे बसलेला दिसला. काही वेळातच तलावाजवळ लोकांची गर्दी जमली. लोकांनी वाघाला जवळून पाहण्याचा प्रयत्न सुरू केला. काही गावकरी अगदी जवळ आले.

Maharashtra tiger deaths
Tiger Deaths : राज्यात १० दिवसांत पाच वाघ मृत्युमुखी…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Loksatta explained What radio collars have revealed about tiger migration
विश्लेषण: ‘रेडिओ कॉलर’मुळे वाघांच्या स्थलांतराबाबत काय कळले?
Tiger attack Viral Video
जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो… वाघाने वाऱ्याच्या वेगाने केला बिबट्यावर हल्ला; पुढे जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप
Bhandara, Selfie , tiger , Suhani tiger ,
VIDEO : झुडपात बसलेल्या वाघासोबत चक्क ‘सेल्फी’, सुहानीच्या बछाड्याला पुन्हा लोकांनी…..
Man Grabs Leopard By Tail
Video: गावकऱ्याची कमाल, पळणाऱ्या बिबट्याची शेपटी पकडून धरून ठेवलं अन् लोकांचा जीव वाचवला; व्हिडीओ होतोय व्हायरल
tiger cut into three pieces bhandara
भंडारा : खळबळजनक! वाघाचे तीन तुकडे करून जंगलात फेकले, शिकार की झुंज…
Tiger Cubs Hunting Deer In Ranthambore Animal shocking Video
शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल

हेही वाचा : अमरावती : जखमेवर फुंकर! जावईबापूंना मंत्रिपद मिळाल्‍याचा आनंद…

शिकार ठिकाणापासून अवघ्या दहा ते २० फूट अंतरावर आले होते. परिस्थिती चिघळण्यापूर्वीच वनविभागाचे रक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फटाक्यांची आतषबाजी केली आणि वाघाला तेथून हाकलले. वाघाचा सुरक्षित जंगलाच्या दिशेने पाठलाग करण्यात आला. मात्र, गर्दीचा वाढता दबाव आणि वाघाच्या उपस्थितीमुळे परिस्थिती केव्हाही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.

या घटनेने मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. अशा घटनांमध्ये लोकांनी संयम बाळगावा आणि वन्य प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. गावकऱ्यांना अशा घटनांमध्ये गर्दी जमू नये, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे, कारण त्यामुळे त्यांच्या सुरक्षेला धोका तर आहेच पण वाघासारख्या वन्य प्राण्यांसाठीही ते घातक ठरू शकते.

हेही वाचा : “वाल्मिक कराडला अटक करा, अन्यथा आंदोलन”, आमदार क्षीरसागर यांचा इशारा

पोलिसांनाही धक्काबुक्की….

लोकांनी वाघाच्या इतक्या जवळ जाणे, जवळ जाऊन त्याचे फोटोशूट करणे, त्याला दगड मारणे हे सर्व अत्यंत अघोरी प्रकार आहेत. विशेष म्हणजे व्याघ्र समितीचे अध्यक्ष हे जिल्हा पोलीस अधीक्षक असताना त्यांच्याच कर्मचाऱ्यांना लोक तिथे धक्काबुक्की करताना दिसतात त्यामुळे ही गंभीर बाब असून जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक आणि उपवन संरक्षक यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. यासंबंधी लेखी तक्रार पोलीस अधीक्षक आणि उपवन संरक्षक राहुल गवई यांनी केली असल्याचे माजी वन्य जीव संरक्षक नदीम खान यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Story img Loader