भंडारा : एरव्ही वाघ दिसला की लोकांना घाम फुटतो आणि अक्षरशः थरकाप उडतो. मात्र सध्या एक नवा ट्रेंड सुरू झालाय. जंगलव्याप्त गावात किंवा परिसरात कुठेही वाघ दिसला की त्या वाघाच्या अगदी जवळ जाऊन लोक त्याच्यासोबत फोटो सेशन करू लागले आहेत. शांत बसलेल्या वाघाला दगड मारणे, त्याच्या जवळ जाऊन मोठमोठ्याने ओरडुन, अगदी जवळून फोटो, व्हिडिओ काढणे, त्याला डीचवणे असे अनेक प्रकार समोर येत आहेत. मात्र या हिंस्त्र प्राण्याचा मूड कधी बदलेल आणि तो कधी हल्ला करेल, याचा नेम नाही. अशा अनेक घटना समोरही आलेल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत खबरदारी घेण्याऐवजी लोक जीव धोक्यात घालत आहेत. असाच एक प्रकार अड्याळ वन परिक्षेत्रात घडला असून वाघासोबत फोटो सेशन करण्यासाठी लोकांनी चक्क त्याला घेरले. विशेष म्हणजे या परिसरात सलग दुसऱ्यांदा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या लोकांवर वन विभागाकडून कारवाई होणार का, असे प्रकार घडू नये यासाठी वन विभाग काय पावले उचलणार असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा