वाशिम: पुरोगामी महाराष्ट्रात आजही मागास समाजावर अन्याय, अत्याचार सुरूच आहेत. वाशिम जिल्ह्यातील बोराळा येथील मागास समाजातील महिला, लहान मुलासाह अनेकजण भीतीपोटी गाव सोडून ई क्लास जागेवर राहत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे.
मालेगाव तालुक्यातील बोराळा गावातील अनुसूचित जातीच्या नागरिकांनी गाव सोडून गावाबाहेर असलेल्या ई क्लास जमिनीवर राहण्याकरिता गेले आहेत. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनानुसार, गावातील काही लोकांच्या त्रासाला कंटाळून, जिवाच्या भीतीपोटी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा… वेडसर भाच्याच्या अविवेकी संतापात मामाचा बळी; जेवणाची तयारी सुरू असतानाच स्वयंपाकघरात आला अन्…
ऐन कडाक्याच्या थंडीत मागास समाजातील चाळीस ते पन्नास पुरुष, महिला, लहान मुले व नागरिकांनी गाव सोडून ई क्लास जागेवर राहण्यास गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच जऊळका रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मागास समाजातील नागरिक आपल्या मागण्यासाठी ठाम आहेत. मात्र अद्याप घटनास्थळी कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याची माहिती आहे.