बुलढाणा : मागील पंधरवाड्यापासून आंदोलन करणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्यमंत्र्यासोबतची चर्चा विफल ठरली आहे. समायोजनाच्या मागणीबाबत राज्य शासन गंभीर नसल्याने कर्मचाऱ्यांनी नव्याने कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यात २ हजार कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीने २५ ऑक्टोबर पासून जिल्हापरिषद समोर आंदोलन केले . यानंतरच्या टप्प्यात ३० व ३१ ऑक्टोबरला मुंबई स्थित आझाद मैदान येथे धरणे देण्यात आले. यावेळी अन्य नेत्यांसह आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भेट दिली.
हेही वाचा : नागपूर : अपंगांच्या सेवेसाठी कृत्रिम अवयव मोबाईल व्हॅन सज्ज
यावेळी कृती समिती सोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली. तब्बल १७ वर्षांपासून कंत्राटी तत्व व अल्प मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मागणी बाबत शासन गंभीर नसल्याचे दिसून आले. यामुळे समितीने नव्याने कामबंद आंदोलन हाती घेतल्याचे जिल्हा समन्वयक डॉ. मुंढे यांनी सांगितले. जिल्हा कचेरीसमोर आयोजित आंदोलनात कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले आहे.