बुलढाणा : मलकापूर येथील बहुचर्चित जग्गु डॉन शेतकरी फसवणूक प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक( एसआयटी) गठीत करण्यात आले आहे. याप्रकरणात आजअखेर ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फसवणुकीतून मुख्य आरोपी जगन रामचंद्र नारखेडे उर्फ जग्गु डॉन याने कोट्यवधी रुपये किंमतीची मालमत्ता खरेदी आणि गुंतवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात प्रसिद्धी माध्यमासोबत बोलताना ही खळबळजनक माहिती दिली. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उप निरीक्षक रोकडे यांनी केला. मात्र घटनेचे गांभीर्य, गुंतागुंत, फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची संख्या, फसवणुकीतून झालेले व्यवहार लक्षात घेता तपासासाठी ‘एसआयटी’ गठीत करण्यात आली आहे. आज अखेरच्या तपासात, २० लाखांच्या नकली नोटा छापण्याच्या ३ मशिन, ४१ लाखांच्या २ महागड्या कार, १९ लाख रुपये रोख जप्त करण्यात आल्याचे कडासने यांनी सांगितले.

Two people from Hadapsar area have cheated of 28 lakhs by cyber thieves
सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
husband wife conversation salary joke
हास्यतरंग : तुमचा पगार…
fraud of rs 15000 crores in state bank of india
स्टेट बँक ऑफ इंडियाची १५ हजार कोटींची फसवणूक; तीन वर्षांतील तपशील माहिती अधिकारातून समोर
500 kg of banned plastic bags seized
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त
mumbai police busts gang printing and selling fake Indian currency notes
बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
share market fraud loksatta news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक

हेही वाचा : ईपीएस वाढीव पेन्शनसाठी महाराष्ट्रात प्रतीक्षाच, निवृत्त कर्मचाऱ्यांना अद्याप ‘डिमांड’ नाही

दुसरीकडे मुख्य आरोपी जग्गु याने शेतकऱ्यांच्या फसवणूक मधून मिळालेल्या पैश्यातून राहत्या गावी (भालेगाव ता. मलकापूर) येथे ७० लाख रुपयांची ४ एकर जमीन, मलकापूर मध्ये २७ लाखांचा ‘फ्लॅट’, २३ लाखांचे गाळे ( दुकाने) खरेदी केले. याशिवाय बोदवड( जळगाव खान्देश) येथील खंडेलवाल जिनिंगचा खरेदीचा सौदा करून २ कोटी ‘ऍडव्हान्स’ दिले आहे. ग्रीन एनर्जी कंपनीत ४६ लाखांची गुंतवणूक केली आहे. जग्गु चा साथीदार आरोपी भगवान घुले याने याच कंपनीत १० लाख गुंतवणूक करून अळसना(ता शेगाव) येथे ४५ लाख रुपयांची ४.७५ एकर शेती घेतली आहे. या मालमत्तांच्या जप्ती करिता न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येत आहे. आज अखेर ९ आरोपींना अटक करण्यात आली असून ८ जन न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलीस अधिक्षकांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : तरुण खवळले तर प्रलय येईल ! संमेलनाध्यक्ष शोभणे यांचा सरकारला इशारा; ९७ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन

काय आहे प्रकरण?

जग्गु डॉन व त्याच्या साथीदारांनी ७५०० रुपये बाजारभाव असताना शेतकऱ्यांकडुन ९ हजार रुपये क्विंटल भावाने कापूस खरेदी केली. सुरुवातीला वेळेवर पैसे मिळाल्याने हजारो शेतकऱ्यांना त्यांनी गंडविले. यातून कोट्यवधी रुपये जमवून गंडा घातला व गडगंज कमाई केली. मागील ३० नोव्हेंबर रोजी अतुल पाटील यांनी तक्रार दिल्यावर भांडाफोड झाला. तपासात धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.

Story img Loader