बुलढाणा: दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या प्रौढ इसमाने टोकाचे पाऊल उचलत आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करून जीवघेण्या यातना आणि वेदनातून कायमची सुटका करून घेतली. यावेळी त्याच्या वयोवृध्द आईने फोडलेला हंबरडा आणि केलेला आकांत गावकऱ्यांच्या काळजाचे पाणी पाणी करणारा ठरला.
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे काल गुरुवारी, २६ सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. यामुळे गावासह चिखली तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. देविदास मोतीराम मोरे असे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या दुर्देवी व्यक्तीचे नाव आहे. जेमतेम अठ्ठेचाळीस वर्ष वयाचे असताना मृत्यूला कवटाळणाऱ्या देविदास मोरे यांचे जीवनच संघर्षमय शोकांतिका ठरली. भूमिहीन असल्याने दारिद्र्य नशिबाला पुरलेले. मिळेल ती कामे करून त्यांनी अनेक वर्षे आपला आणि मुला बाळांचा उदर निर्वाह केला. मुले मोठी आणि कमावती झाल्यावर मोरे काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. तिथे त्यांची मुले देखील एका खाजगी कंपनीमध्ये कामाला लागली होती. त्यामुळे मोरे यांची रोजची दगदग आणि धावपळ कमी झाली.
हेही वाचा : MPSC Result: वडिलांचे छत्र हरपले, आर्थिक परिस्थितीशी संघर्ष; वैष्णवी झाली उपजिल्हाधिकारी
कॅन्सरचे निदान
जीवनात थोडी स्थिरता लाभली, पोरं कमावती झाल्याचे समाधान मिळाले. मात्र नियती म्हणा की नशिबाला म्हणा हे मंजूर नव्हते! यादरम्यान देविदास मोरे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना डॉक्टरांना दाखविले. त्या डॉक्टरला शंका आल्याने त्याना मोठ्या रुग्णालयात दाखविण्यात आले. तपासणी आणि विविध वैद्यकीय चाचण्या अंती देविदास मोरे यांना कर्करोग( कॅन्सर ) हा जीवघेणा आजार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उपचार करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने विविध ठिकाणी त्यांना भरती केले होते. अनेक डॉक्टरांना दाखविले.
गावी परतले…
मात्र, काही केल्याने प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने देविदास मोरे निराशेतच चिखली तालुक्यातील आपल्या मुळ गावी अंत्री खेडेकर येथे परतले. दरम्यान, काल गुरुवारी, २६ सप्टेंबर रोजी त्याना वेदना होऊ लागल्या. या वेदना आणि सततचा त्रास असह्य झाल्याने त्यांनी अखेर टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी राहत्या घरातील छताला गळफास लावून स्वतःला संपविले. काही वेळाने त्यांच्या वयोवृद्ध आईने घराचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बराच वेळ होऊन देखील दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या काळजात धस्स झाले! त्यांनी आरडाओरड करीत शेजारी पाजाऱ्यांना आवाज दिला. त्यानंतर शेजारी आणि गावकऱ्यांनी दरवाजा उघडला असता देविदास मोरे छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले.
हेही वाचा : MPSC Results: राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; नागपूरची वैष्णवी बावस्कर मुलींमध्ये अव्वल
मुलाने फाशी घेतल्याने म्हाताऱ्या आईने हंबरडा फोडला, गावकऱ्यांना देखील मोठा मानसिक धक्का बसला. आईच्या आकांताने उपस्थित महिलांची देखील रडारड सुरू झाली.
पोलिसांनी काढला मृतदेह खाली
दरम्यान काही गावकऱ्यांनी घटनेची माहिती अंढेरा पोलीस ठाण्यात दिली. ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कैलास उगले यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. पोलिसांनी देविदास चा मृतदेह खाली उतरविला. प्रकरणी आकस्मिक मृत्यूची ( मर्ग )नोंद करण्यात आली आहे. देविदास मोरे अनेक दिवसांपासून दुर्घर आजाराने त्रस्त होते. आजारपणाला कंटाळून तसेच नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.