बुलढाणा : राजकीय पद देण्याचे आमिष दाखवून शेगावमधील एका कथित पुढाऱ्याने अमरावती येथील महिलेच्या अब्रूचे धिंडवडे उडविले. फेसबुकवर ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यातील ३८ वर्षीय विवाहित महिलेस पक्षाचे पद देण्याचे आमिष दाखवून त्याने तिला जाळ्यात ओढले. दोन मुलांची आई असलेल्या महिलेसोबत जवळीक वाढविली. दरम्यान आई आजारी असल्याचा बहाणा करून तिला शेगांव येथील घरी बोलाविले. शितपेयात गुंगीचे औषध देवुन बळजबरीने शारीरीक अत्याचार केले. तसेच तिचे आपत्तीजनक फोटो काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…“महाराष्ट्रातून चार मुस्लीम खासदार लोकसभेत पाठवा,” असदुद्दीन ओवेसी यांचे आवाहन; म्हणाले, “धर्मातून नेतृत्व निर्माण झाले तरच…”

हे फोटो समाज माध्यमावर सार्वत्रिक करण्याची धमकी देत त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केले.दरम्यान पिडीतीने शेगाव शहर पोलिसात फिर्याद दिली. शेगाव शहर पोलीसांनी आरोपी आशिष सत्यानारायण व्यास (वय ३७ वर्षे, रा. स्वामी विवेकानंद चौक शेगाव) याचे विरूध कलम ३७६ (२), (एन),३२८,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलीस निरीक्षक आयरे हे करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana a man from shegaon sexually abuse married woman of amravti with lure of political party post case registered scm 61 psg